घरमनोरंजनकंगना कुटुंबीयांसोबत पोहोचली वृंदावनात; घेतलं श्रीकृष्णांचं दर्शन

कंगना कुटुंबीयांसोबत पोहोचली वृंदावनात; घेतलं श्रीकृष्णांचं दर्शन

Subscribe

कंगना सोमवारी आपल्या कुटुंबीयांसोबत वृंदावन मधील ठाकूर बांके बिहारी मंदिरात गेली होती. यावेळी मंदिरात गेल्यावर कंगनाने श्री कृष्णांची मनोभावे पूजा केली आणि त्यांचे दर्शन घेतले.

बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे वारंवार चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने कंगना सोमवारी आपल्या कुटुंबीयांसोबत वृंदावन मधील ठाकूर बांके बिहारी मंदिरात गेली होती. यावेळी मंदिरात गेल्यावर कंगनाने श्री कृष्णांची मनोभावे पूजा केली आणि त्यांचे दर्शन घेतले.

दररोज श्री कृष्णांच्या या मंदिरामध्ये देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. सोमवारी कंगना रनौत देखील आपल्या कुटुंबीयांसोबत तिथे पोहोचली.

- Advertisement -

कंगनाने घेतलं मनोभावे दर्शन
श्री धाम वृंदावनामध्ये श्री कृष्णांच्या मनमोहक रूपाचे दर्शन घेतले. यावेळी कंगना देवाच्या भक्ति रसात रंगून गेलेली दिसली. मंदिरातील पूजाऱ्यांनी विधी पूर्वक कंगनाकडून पूजन करून घेतलं. कंगनाने प्रार्थना करत राधे राधे चा जयघोष केला. त्यानंतर कंगना आपल्या कुटुंबीयांसह निधिवन राज मंदिराकडे रवाना झाली.दरम्यान, मथुरीतील फोटो कंगनाने तिच्या सोशल मीडियावर देखील शेअर केला होता.

- Advertisement -

‘इमर्जन्सी’चं दिग्दर्शन देखील कंगना रनौत स्वतः करत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी कंगनाचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत. या चित्रपटामध्ये कंगना सोबत महिमा चौधरी, अनुपम खेर, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत.


मलायकाच्या ‘अरोरा सिस्टर्स’ कार्यक्रमात अरबाज खान आणि अर्जुन कपूर येणार समोरासमोर?

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -