घरमनोरंजनकरण जोहरच्या 'बेधडक'मधून 'हे' तीन नवे चेहरे करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

करण जोहरच्या ‘बेधडक’मधून ‘हे’ तीन नवे चेहरे करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Subscribe

आज करण जोहरने त्या तीन नव्या नावांचा खुलासा केला आहे. 'बेधडक' या आगामी चित्रपटातून हे तिनही चेहरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर नेहमीच अतरंगी ढंगातल्या विषयांवर आधारित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. सोशल मीडियावरही तो बराच सक्रिय असतो. अशातच येत्या काही दिवसात करण जोहरचा प्रेक्षकांसाठी आगामी चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाबाबत करणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्याने ३ मार्च रोजी तीन नव्या चेहऱ्यांना लाँच करणार असल्याची घोषणा केली.

आज करण जोहरने ‘त्या’ तीन नव्या चेहऱ्यांचा आणि त्यांच्या नावांचा खुलासा केला आहे. ‘बेधडक’ या आगामी चित्रपटातून हे तिनही चेहरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. यातील पहिले नाव आहे, लक्ष्य लालवाणी, दुसरे नाव संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर तर तिसरं नाव आहे गुरफतेह पीरजादा

- Advertisement -

‘बेधडक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतान याने केलं असून यातून करण जोहर या तीन नव्या चेहऱ्यांना लाँच करणार  आहे. करणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर केलयं, यातून करणने आगामी चित्रपटातील कलाकारांची ओळख करून दिली आहे.

तसेच करणने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आम्ही तुमच्या समोर एक प्रेमकथा मांडणार आहोत. या चित्रपटात करण ही भूमिका लक्ष्य लालवाणी साकारणार आहे. तर निमृत ही भूमिका शनाया कपूर साकारणार असून अभिनेता गुरफतेह पीरजादा अंगद ही भूमिका निभावणार आहे. यातील लक्ष्य लालवणी याने याआधी टेलिव्हिजनवर सुद्धा काम केलं आहे. तर शनाया कपूरचे ही सोशल मीडियावर अॅटिव्ह असते, तिचे सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

- Advertisement -

करण जोहर नेहमीचं त्याच्या चित्रपटांमध्ये नव्या चेहऱ्यांना लाँच करत असतो. ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटामध्ये देखील त्याने आलिया भट्ट,वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा तर ‘धडक’ या चित्रपटातून जानवी कपूर, ईशान खट्टर या नव्या चेहऱ्यांना लाँच केल होतं.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -