सलमान खानच्या नव्या चित्रपटाचा जबरदस्त टिझर पाहिलात का?

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser | सलमान खानचे चित्रपट रिलीज नेहमीच एका मेगा फेस्टिव्हलसारखे असतात. अशातच, ईदच्या खास मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार असून, या सिनेमात प्रत्येकासाठी काही ना काही आहे, ज्यामुळे हा एक परफेक्ट फॅमिली एंटरटेनर बनतो.

salman khan

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser | सलमान खानच्या आगामी चित्रपटाचा टिझर रिलीजची घोषणा झाल्यापासून मेगास्टार सलमान खानचे चाहते ‘किसी का भाई किसी की जान’या सिनेमाचा टिझर लॉन्चची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर सर्वत्र टिझरबद्दल चर्चा सुरु होती, तसेच, ‘किसी का भाई किसी की जान’या चित्रपटातील सलमान खानची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अशातच, आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला असतानाच, निर्मात्यांनी अखेरीस या सिनेमाचा टिझर प्रदर्शित केला आहे आणि हा टिझर डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser launched)

टिझरची सुरुवात सलमानच्या “सही का होगा सही, गलत का होगा गलत” या डायलॉगने होत असून यामध्ये सलमान खानचा सिग्नेचर स्वॅग पाहायला मिळेल. तसेच, या टिझरमध्ये “वैसे मेरा कोई नाम नहीं, पर में भाईजान के नाम से जाना जाता हूं” यांसारख्या लाइन्स आणि असे काही क्षण तसेच डायलॉग्स आहेत जे येत्या काळात सामान्य भाषेचा एक मुख्य भाग नक्कीच बनतील.

सलमान खानचे चित्रपट रिलीज नेहमीच एका मेगा फेस्टिव्हलसारखे असतात. अशातच, ईदच्या खास मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार असून, या सिनेमात प्रत्येकासाठी काही ना काही आहे, ज्यामुळे हा एक परफेक्ट फॅमिली एंटरटेनर बनतो.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा ‘किसी का भाई किसी की जान’या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला ‘किसी का भाई किसी की जान’हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.