घरमनोरंजन'सूर नवा ध्यास नवा'च्या सेटवर आमदार विजय सरदेसाईंनी घातला गोंधळ

‘सूर नवा ध्यास नवा’च्या सेटवर आमदार विजय सरदेसाईंनी घातला गोंधळ

Subscribe

अवधूत गुप्ते यांनी मध्यस्ती केल्यानंतर हा तणाव निवळल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच कार्यक्रमाच्या निर्मिती संस्थेकडून आवश्यक त्या सर्व परवानगी घेतली असआल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

जगभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. कोरोना रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी  राज्यसरकारने कडक लॉकडाऊन जाहीर केलं आहे .महाराष्ट्रराज्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे मनोरंजनसृष्टीचे कामकाज पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण अनेक निर्मात्यांनी दुसर्‍या राज्यात शूटिंग करण्याचा निर्णय घेतला यामध्ये गोवा राज्याला अनेक मालिकांनी चित्रीकरणासाठी पसंती दर्शवली होती आणि शूटिंग गोव्यात हलवण्यात आले. गोव्यात देखील रुग्णसंख्येचा आकडा वाढलेला असताना अद्याप गोव्यामधील प्रशासनाने संपूर्ण लॉकडाऊन लागू न करता कडक निर्बंध घोषित केलं आहे. सध्या तरी गोव्यात प्रवाशांची ये-जा आणि अनेक कार्यक्रमांचं चित्रीकरण सुरु आहे.गोव्यात सुरू असणार्‍या चित्रीकरणावर आता स्थानिक राजकीय नेतेमंडळी आणि काही नागरिकांचाही विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे. कलर्स वाहिनी वरील सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो, ‘सूर नवा ध्यास नवा’च्या गोव्या मधील सेटवर गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याचं दिसत आहे.

- Advertisement -

गोव्यातील मडगाव येथे असणाऱ्या रवींद्र भवनमध्ये या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरु असतानाच सरदेसाई यांनी मध्ये येऊन विरोध करण्यास सुरुवात केली. गोव्यामधील  मडगाव आणि फातोर्डा परिसरात चित्रीकरणामुळे  कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. दरम्यान प्रसंगअवधान राखत गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी मध्यस्ती केल्यानंतर हा तणाव निवळल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच कार्यक्रमाच्या निर्मिती संस्थेकडून आवश्यक त्या सर्व परवानगी घेतली असआल्याचे देखील सांगण्यात येत आहे.


हे हि वाचा – ‘Go Corona Go’, महिलांनी पुजेसाठीच्या गर्दीवर प्रकाश राजची भन्नाट कमेंट

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -