अभिनेत्री मलायका अरोराच्या घरी पोलीस; चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

बॉलिवूड अभिनेत्री मलायचा अरोरा (actress malaika arora) हिच्या घरी पोलिस दाखल झाले आहेत. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस (Police) मलायकाची चौकशी करताना दिसत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री मलायचा अरोरा (actress malaika arora) हिच्या घरी पोलिस दाखल झाले आहेत. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस (Police) मलायकाची चौकशी करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी अभिनेता सलमान खानला (Salman Khan) या धमकी देणारे पत्र मिळाले होते. त्यानंतर पोलिसांकडून सलमानला संरक्षण देण्यात आले आहे. त्यानंतर आता अचानक मलायकाच्या घरी पोलीस गेल्याने मलायकाच्या चाहत्यांमध्ये आणि बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण आले आहे. (mumbai police reached at actress malaika arora home video viral)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये (Viral Video) अभिनेत्री मलायका तिच्या घरी सोप्यावर बसली असून समोर पोलीस उभे राहून तिची चौकशी करत असल्याचे दिसते. परंतु, पोलीस मलायकाची कोणत्याही प्रकरणात चौकशी करण्यासाठी करत नसून पोलिसांच्या एका कार्यक्रमाचे आंमत्रण (Mumbai Police Invitation) देण्यासाठी पोलीस तिच्या घरी गेले होते. त्यानुसार, मलायका लवकरच मुंबई पोलिसांच्या एका कार्यक्रमात दिसणार आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा सध्या सिनेमांपासून दूर असली तरी, नेहमीच विविध प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. या व्हिडीओंच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. शिवाय, अभिनेता अर्जुन कपूर याच्याबरोबर असलेल्या रिलेशनशिपमुळेही मलायका सतत चर्चेत असते.

मलायका नुकतीच तुर्कीला सुट्ट्या घालवण्यासाठी गेली होती. तुर्की ट्रिपचे सगळे व्हिडीओ आणि फोटो मलायकाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत. असं असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. मलायका टेलिव्हिजनच्या अनेक शोमध्ये जजींग करत असते.

अनेक ब्यूटी कॉन्टेस्ट त्याचप्रमाणे डान्स रिअलिटी शो इंडियास बेस्ट डान्सरमध्ये जजींग करताना दिसली होती. मलायका पुन्हा मोठ्या स्क्रिनवर पाहण्यासाठी तिचे फॅन्स आतूर आहेत.


हेही वाचा – ‘अन्य’ चित्रपटाद्वारे इंडियन आयडल फेम सलमान अलीची मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री