घरमनोरंजननाना पाटेकर यांच्याशी थेट बातचीत!

नाना पाटेकर यांच्याशी थेट बातचीत!

Subscribe

तनुश्रीने लावलेल्या आरोपांवर नाना पाटेकर काही बोलणार का? बोलले तर काय बोलणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

अलीकडे छोट्या पडद्यावरील मालिकांसोबतच कथाबाह्य कार्यक्रमांनाही प्रेक्षकांची पसंती मिळू लागली आहे. त्यामुळे टीव्हीवर अनेक प्रकारचे नवनवीन कथाबाह्य कार्यक्रम येऊ लागले आहे. कलर्स मराठी वाहिनीवर याच धाटणीचा एक नवा कार्यक्रम नुकताच सुरु झाला अाहे. ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ असं या कार्यक्रमाचं नाव असून विनोदी अभिनेता या शोचं सूत्रसंचालन करत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमामध्ये अॅडव्होकेट उज्वल निकम, विक्रम गोखले, सिंधूताई सपकाळ आतिशा नाईक आदी पाहुण्यांनी हजेरी लावली आहे. मात्र, आता उत्सुकता आहे ती ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’मध्ये पुढील आठवड्यात येणाऱ्या पाहुण्यांविषयीची. सध्या चर्चेत असेलेले अभिनेते नाना पाटेकर आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी पुढील आठवड्यात या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. नेहमीप्रमाणेच मकरंद अनासपुरे या दोन्ही दिग्गजांची मुलाखत घेतील. नाना पाटेकर आणि नितीन गडकरींची ही खास मुलाखत ४ आणि ५ ऑक्टोबरला प्रसारित होणार आहे. सध्या सोशल मीडियावर याच मुलाखतीचा एक टिझर व्हायरल होतो आहे.

- Advertisement -

या प्रोमोमध्ये नाना पाटेकर या प्रोमोमध्ये इंग्रजी भाषेविषयी बोलताना दिसत आहेत. तर नितीन गडकरी आपले काही मजेशीर किस्से सांगताना दिसत आहेत. त्यामुळे हा एकंदरच ही मुलाखत रंगत असणार असं दिसतं आहे. दरम्यान सध्या तनुश्री दत्ता प्रकरणामुळे नाना पाटेकरांचं नाव चांगलच चर्चेत आहे. तनुश्रीने नानांवर लावलेल्या आरोपांवर नाना काय प्रत्युत्तर देतायत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. आता ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’मध्ये नाना या प्रकरणाविषयी काही बोलणार का? बोलले तर काय बोलणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.


वाचा: नाना पाटेकरांनी तनुश्रीला बजावली नोटीस!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -