Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Thalaivii : जयललिता असत्या तर कंगनाला नव्हे ऐश्वर्याला मिळाला असता बायोपिकमध्ये रोल

Thalaivii : जयललिता असत्या तर कंगनाला नव्हे ऐश्वर्याला मिळाला असता बायोपिकमध्ये रोल

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची ‘धाडक गर्ल’ अभिनेत्री कंगना रनौत नव्या दर्जेदार चित्रपटांसाठी ओळखली जाते. कंगनाने आत्तापर्यंतच्या तिच्या कारकिर्दीमध्ये स्वत:ला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेय. अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील कंगना राजकारणापासून बॉलिवूडपर्यंत चर्चेचा विषय ठरते. मात्र आता ती एका वेगळ्या कारणासाठी चर्चेचा विषय ठरतेय. ते म्हणजे थलाईवी. बहुचर्चित थलाईवी चित्रपटानिमित्त कंगनाचे सर्वत्र कौतुक केले जातेय. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे.जयललिता यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात कंगनाने जयललिता यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी कंगनाने अधिकच मेहनत घेतल्याचे पाहयला मिळत आहे.

नुकताच या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग सोहळा पार पडला. या स्क्रीनिंगवेळी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यात अभिनेत्री सिमी ग्रेवाल देखील उपस्थित होती. स्क्रीनिंगनंतर सिमी ग्रेवालने थलाईवी चित्रपटाची प्रशंसा करत जयललितांसंबंधीत काही गोष्टी शेअर केल्या. ‘जयललिता जिवंत असत्या तर कंगना रनौतच्या नाही तर त्या जागी ऐश्वर्या राय बच्चनला बायोपिकमध्ये रोल देण्याचा निर्णय घेतला असता.’ असा मोठा खुलासा सिमीने केला आहे. यामुळे आता कंगना यावर काय बोलते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

- Advertisement -

सिमी ग्रेवालने ट्वीट करत म्हटले की, कंगनाच्या मूलगामी विचारांना मी समर्थन देत नाही, मात्र मी तिच्या अभिनय कौशल्याचे कौतुक करते. थलाईवीसाठी तिने आपले ह्रदय आणि आत्मा दोन्ही दिलेय. मात्र जयललिता यांची इच्छा होती की, ऐश्वर्या राय बच्चनने जयललिता यांची भूमिका साकारावी. परंतु जया जींनीनंतर कंगनाला ही भूमिका साकारण्यासाठी होकार दिला असेल असा माझा अंदाज आहे. तर अरविंद स्वामी यांच्यावर बोलायचे झाल्यास ते MGR च्या अवतारात आहे.

कंगनाचेही केले कौतुक

- Advertisement -

सिमी ग्रेवालने थलाईवी चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचे देखील विशेष कौतुक केले. साहजिकच कंगनाने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. जयललितांचे अगदी १६ वर्षांच्या किशोरवयीन मुलीपासून ते मध्यम वयापर्यंत पात्र अतिशय परिश्रमपूर्वक आणि सुंदरपणे साकारले आहे. त्यामुळे कंगनाच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकून घेतली.

कंगनाशिवाय चित्रपटात दिसतायतं ‘हे’ स्टार्स

‘थलाईवी’ मध्ये कंगना रनौवत व्यतिरिक्त अभिनेते प्रकाश राज, जिशु सेनगुप्ता, भाग्यश्री आणि पूर्णा मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

कंगना लवकरच ‘या’ चित्रपटांमध्ये झळकणार 

थलायवीनंतर कंगना लवकरच अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्तासोबत ‘धाकड’ चित्रपटात दिसणार आहे. यासोबत ती ‘तेजस’चाही एक भाग आहे, ज्यात ती हवाई दलाच्या वैमानिकाची भूमिका साकारणार आहे.


Gauri Ganpati 2021 : दोन्ही सुनांना गौराईचा मान दिला, अन् मखरात बसवून केली पूजा


 

- Advertisement -