घरमनोरंजनखायचे वांदे अन् बघताहेत 900 रुपयांची तिकीट काढून 'पठाण'; नेटकऱ्यांकडून पाकिस्तान ट्रोल

खायचे वांदे अन् बघताहेत 900 रुपयांची तिकीट काढून ‘पठाण’; नेटकऱ्यांकडून पाकिस्तान ट्रोल

Subscribe

बॉलिवूडचा किंग खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 25 जानेवारी रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. 7 दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून भारतातील अनेक चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. फक्त भारतातच नव्हे तर पठाणची भुरळ आता पाकिस्तानमधील प्रेक्षकांना देखील पडली आहे. पाकिस्तानमध्ये बेकायदेशीररीत्या ‘पठाण’ चित्रपट दाखवला जात असून एक तिकिट 900 रुपयांना विकले जात आहे.

पाकिस्तानी प्रेक्षकांना ‘पठाण’ची भुरळ

pathaan pakistan

- Advertisement -

परदेशातील इतर देशांसोबतच पाकिस्तानी प्रेक्षकांना देखील ‘पठाण’ चित्रपटाची भुरळ पडली आहे. मात्र, मागील चार वर्षांपासून पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे 25 जानेवारी रोजी पाकिस्तान सोडून इतर अनेक देशांमध्ये ‘पठाण’ प्रदर्शित झाला. परंतु तरीही ‘पठाण’ पाकिस्तानमधील कराची येथे चोरुन दाखवला जात आहे. त्यासाठी प्रेक्षक 900 रुपयांचे एक तिकिट खरेदी करण्यासाठी देखील तयार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये यूके बेस्ड असलेल्या फायरवर्क इवेंट्स कंपनीने फेसबुक पोस्ट करुन ‘पठाण’च्या चित्रीकरणाची माहिती दिली होती. ही जाहिरात प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर अनेकांनी 900 रुपये देऊन तिकिटं बुक केली.

900 रुपयांचे तिकिट खरेदी करणारे पाकिस्तानी प्रेक्षक ट्रोल

सध्या पाकिस्तानमध्ये आर्थिक मंदीची लाट पसरली आहे. पाकिस्तानात अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे दर आभाळाला टेकले आहेत. परंतु तरीही आता अनेक प्रेक्षक 900 रुपयांचे तिकिट खरेदी करुन पठाण चित्रपट पाहत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी ट्रोल करु लागले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, भारतातील अनेक चित्रपटगृहांबाहेर ‘पठाण’ हाऊलफुल झाल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच परदेशात देखील रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 349 कोटी कमावले आहेत. जगभरातून या चित्रपटाने 600 कोटींचा टप्पा पार केला आहे.


हेही वाचा :

‘पठाण’ नंतर सोशल मीडियावर शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाची चर्चा; लूक झाला लीक

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -