प्राजक्ता माळीच्या पावसाळी ट्रिपची सोशल मीडियावर चर्चा, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

प्राजक्ताच्या पावसाळी ट्रिपची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. प्राजक्ताच्या फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स येत आहेत.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी(prajakta mali ) सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती सोशल व्यक्त सुद्धा होत असते. मीडियावर प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या सुद्धा संपर्कात असते. स्वतःचं बिझी शेड्युल सांभाळून अभिनेत्री प्राजक्ता माळी मध्यंतरी हिमाचल ट्रिपला सुद्धा गेली होती. त्यावेळी सुद्धा प्राजक्ताने हिमाचल मधल्या निसर्गाच्या सानिध्यातले स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हिमाचल(himalaya) ट्रिप प्रमाणेच प्राजक्ताने तिची पावसाळी ट्रिप सुद्धा एन्जॉय केली आहे. प्राजक्ताच्या पावसाळी ट्रिपची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.

आणखी वाचा –  प्रियंका चोप्राचा अमेरिकेत नवा व्यवसाय, ‘सोना होम’मधील वस्तूंच्या किमतीची सोशल मीडियावर चर्चा

आणखी वाचा –  ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘राजी-नामा’ चीच चर्चा

 

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'(maharashtrachi hasyajatra) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण टीम ट्रिप साठी लोणावळ्याला गेली होती. याच ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी(prajakta mali) हिने निसर्गाच्या सानिध्यातले स्वतःचे काही फोटो आणि एक व्हिडीओ सुद्धा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

आणखी वाचा – बहुचर्चित ‘लायगर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, करण जोहरने शेअर केलेल्या विजय देवरकोंडाच्या लूकची…

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आणखी वाचा – आयर्नमॅन मिलिंद सोमणच्या ‘या’ वर्कआऊट टिप्स फॉलो करत रहा फिट

प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओ मध्ये खूप सुंदर निसर्ग पाहायला मिळतो आहे. हिरवीगार शाल पांघरलेले डोंगर, घनदाट जंगल या सगळ्यामुळे प्राजक्तच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहेत. प्राजक्ताने(prajakta mali) शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स सुद्धा आल्या आहेत. त्यात एकाने असं म्हटलं आहे, की ” काय ते डोंगार, काय ती प्राजक्ता, काय ते फोटो, एकदम ओके”. तर आणखी एकाने कमेंट केली, ”अप्रतिम प्राजु” या आणि अश्या काही मजेशीर कमेंट्स(comments) प्राजक्ता माळीच्या फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा –  डॉक्टर्स डेच्या निमित्ताने जंगली पिक्चर्सने चाहत्यांना दिली “डॉक्टर जी” ची खास भेट

 

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची संपूर्ण टीमने लोणावळ्यामधे पावसाळी ट्रिपचा मनमुराद आनंद लुटला. अभिनेता समीर चौघुले आणि अभिनेत्री नम्रता संभेराव यांनी सुद्धा या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'(maharashtrachi hasyjtra) ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करते आहे. या मालिकेचे अनेक चाहते सुद्धा आहेत. लवकरच या कार्यक्रमाचे नेवे पर्व सुरु होणार आहे. त्यामुळे हास्यवारीचा हा आनंद नक्कीच द्विगुणित होणार आहे.