घरमनोरंजनआयर्नमॅन मिलिंद सोमणच्या 'या' वर्कआऊट टिप्स फॉलो करत रहा फिट

आयर्नमॅन मिलिंद सोमणच्या ‘या’ वर्कआऊट टिप्स फॉलो करत रहा फिट

Subscribe

भारतच सुपर मॉडेल आणि ५६ वर्षीय मराठमोळा अभिनेता मिलिंद सोमण आपल्या जबरदस्त बॉडी आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. त्याने आजवर आयर्नमॅन आणि अल्ट्रामॅनसारख्या स्पर्धा जिंकल्या आहेत. मिलिंद हा एक फिटनेस फ्रीक मॉडेल म्हणून ओळखला जातो. ज्याचे इन्स्टाग्राम वर्कआउट्स आणि योगा सेशनच्या फोटोंनी भरलेले आहे.

56 व्या वर्षीही मिलिंद शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात कधी सायकल चालवताना, कधी पुश-अप करताना तर कधी पुल अप करताना दिसतो. मिलिंदच्या मते, प्रत्येकाने आपल्या वयाप्रमाणे आरोग्याबाबत सतर्क असणे आवश्यक आहे, कारण वय वाढत तसे आपले स्नायू देखील कमकुवत होतात.

- Advertisement -

फिटनेसबाबत बोलताना मिलिंद सांगतो की, व्यायाम करताना किंवा योगा करताना लक्ष केंद्रित करणे गरज असते जेणेकरून दुखापत टाळता येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

- Advertisement -

मिलिंदच्या मते, वाढत्या वयानुसार नियमित व्यायाम आणि योगासने करावेत. यामुळे शरीर नेहमी तंदुरुस्त राहते शिवाय दुखापत होण्याची शक्यताही कमी असते. यात शरीरातील दुखापतीचा धोका कमी करण्याचा मूळ मंत्र म्हणजे नैसर्गिक हालचाल करणे आणि संयम राखणे.

हे ही वाचा –  पावसात भिजण्यापूर्वी केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्सचा नक्कीच उपयोग होईल

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

मिलिंद सांगतो की, तो फिट राहण्यासाठी रोजचं धावत नाही तर तो किमान १५ ते २० मिनिटे व्यायाम करतो. जेणेकरून शरीरातील स्नायूंना दुखापत न होता वाटेल तशी हालचाल करता येते. यात शरीराच्या तंदुरुस्तीसाठी सर्वोत्तम व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. ज्यामुळे शरीर लवचिक बनते. यात जर नियमित व्यायाम केल्या शरीर सक्रिय राहते शिवाय स्नायू मजबूत होतात.


Vegan Diet म्हणजे काय ? बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा करतात फॉलो


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -