घरमनोरंजनप्यार दो प्यार लो; पाहा, नोरा फतेहीचा 'रेखा' अवतार

प्यार दो प्यार लो; पाहा, नोरा फतेहीचा ‘रेखा’ अवतार

Subscribe

‘मरजावां’ या नवीन चित्रपटातलं प्यार दो प्यार लो गाण्याच रिलीझ

दिलबर, दिलबरआमिसाकी साकीया आयटम साँगनंतर पुन्हा एकदा नोरा फतेही आपल्या हॉट नृत्यातून चाहत्यांना घायाळ करण्यासाठी येत आहे.  मरजावां या चित्रपटातीलएक तो कम जिंदगानीहे गाणंजानबाज (१९८६)’ चित्रपटाच रेखावर चित्रीत केलं होतं. ‘प्यार दो प्यार लोया गाण्याचं रिमिक्स आहे. नोरा फतेही डान्स डिवा निर्मात्यांना प्रिय झालेली आहे. चित्रपटात तिचा एखादा तरी आयटम नंबर असला तर तो चित्रपट नक्कीच गाजतो. नोरा, जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस या चित्रपटात शेवटची झळकली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोराने यावेळीएक तो कम जिंदगानीहे गाणं विनामूल्य केले आहे. यामागे एक खास कारण आहे.

- Advertisement -

सत्यमेव जयते या चित्रपटातलं दिलबर, दिलबर गाणं, चित्रपट निर्माते निखिल अडवाणी आणि निर्माता भूषण कुमार यांनी नोराला ऑफर केलं होतं. जे तिच्या करिअरसाठी महत्त्वाच ठरलं. यासाठी ती दोघांचीही फारच ऋणी आहे. निखिल आणि भूषण कुमार यांनी दिलेल्या संधी बद्दल तिने अनेकदा कृतज्ञता व्यक्त केली आहे.

- Advertisement -

एक तो कम जिंदगानीहे गाणं प्रसिध्द गायिका नेहा कक्करने गायलं आहे, गाण्याचं नृत्य दिग्दर्शन आदिल शेख यानं केलं आहे. रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारीया हे चित्रपटीतील कलाकार आहेत. निर्माता भूषण कुमार आणि दिग्दर्शक निखिल अडवाणी यांचामरजावांचित्रपट १५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -