घरमनोरंजनआर माधवनने सांगितला मुंबईच्या बीचवरील रोमान्सचा किस्सा

आर माधवनने सांगितला मुंबईच्या बीचवरील रोमान्सचा किस्सा

Subscribe

‘रहना है तेरे दिल में’ फेम बॉलिवूड अभिनेता आर माधवनला त्याचे वैयक्तिक आयुष्य कॅमेरापासून दूर ठेवणे आवडते. मात्र इतक्या वर्षांनंतर आर.माधवनने आपल्या प्रेम कहाणीचा किस्सा एका मुलाखतीत शेअर केला आहे. आठ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आर.माधवनने १९९९ मध्ये त्यांची त्याची सर्वात जुनी मैत्रीण आणि गर्लफ्रेंड सारिका हिच्यासोबत लग्न केले. लग्नापूर्वी हे दोघे एकमेकांना डेट करत होते, मात्र मुंबईच्या बीचवर रोमान्स करताना एकदा पोलिसांनी दोघांना पकडले होते.

आर.माधवनला रोमान्स करताना पोलिसांनी पडकले तेव्हा…

एका मुलाखतीत माधवनला मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे बँडस्टॅड आणि कार्टर रोड संबंधीत आठवणींबद्दल विचारण्यात आले. तेव्हा आर.माधवन म्हणाला, ‘मी जेव्हा सरिताला डेट करत होतो, तेव्हा एक खास जागा होती जिथे आम्ही अनेकदा रोमान्स करायचो. त्यामुळे या दगडांच्या अनेक कहाण्या आहेत. मुंबईतल्या इतर जोडप्यांप्रमाणे आमचं नातं सुरू झालं. यात कधी डबलडेकर बसने फिरणं, कधी दगडांच्या मागे. याचदरम्यान एकदा एका पोलिसाने आम्हाला ‘घरी जा’ म्हटले आणि बस्स…या जागेशी आमच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

- Advertisement -

माधवनने पुढे मुंबईच्या स्ट्रीट फूडबद्दलच्या आठवणीही शेअर केल्या. ‘कधी रस्त्यावर पाणीपुरी, वडापावचा भरपूर आस्वाद घ्यायचो,’ असे त्याने सांगितले. जमशेदपूरमध्ये वाढलेल्या माधवनने मुंबईतून आपल्या करिअरला सुरुवात केली. आज तो बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी अभिनेत्यांमध्ये गणला जातो.

- Advertisement -

आर माधवनचे आगामी चित्रपट

अभिनेत्याच्या प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, माधवनचे सध्या बरेच चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. यात नेटफ्लिक्सवर रिलीज होणारा सुरवीन चावलासोबतचा ‘डीकपल्ड’ चित्रपट १७ डिसेंबरला रिलीज होणार आहे. याशिवाय रॉकेट्री: द नांबी इफेक्ट, अमरीकी पंडित, धोका आणि द रेल्वे मेन असे चित्रपट यादीत आहेत. अभिनेता शेवटचा तमिळ चित्रपट ‘मारा’ मध्ये दिसला होता.


Hashtag Prem: सुयश म्हणतोय थोडा थोडा विचारात आहे मी तुझ्या…!

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -