Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन रणवीर सिंहने यशराज फिल्म्सची सोडली साथ?

रणवीर सिंहने यशराज फिल्म्सची सोडली साथ?

Subscribe

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह विविध कारणांमुळे चर्चेत असतो. रणवीर त्याच्या अभिनयासोबतच आपल्या उत्साही स्वभावामुळे लाखो चाहत्यांच्या मनात घर तयार केले आहे. दरम्यान, आता रणवीरबाबत समोर आलेल्या एका बातमीनुसार सगळेचजण आश्चर्यचकित झाले आहेत. खरंतर, रणवीर सिंहने वाय आर एफ या प्रोडक्शनपासून आपली वाट वेगळी केली आहे. प्रोडक्शन हाऊसच्या जवळील सूत्रांकडून याबाबत खुसाला करण्यात आला आहे. तसेच आणखी मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर आणि वाय आर एफ प्रोडक्शन हाऊसचे संबंध पूर्वी सारखेच आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

दरम्यान, रणवीर सिंहने वाय आर एफ म्हणजेच यशराज फिल्म्सच्या बँड बाजा बारात या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तसेच आता रणवीर आणि यशराज फिल्म्सचे रस्ते वेगळे होण्यावर सूत्रांनी सांगितले आहे की, “यशराज फिल्म्स नेहमी रणवीर सिंहसाठी एक घर राहिल. या इंडस्ट्रीमध्ये आदित्य चोपडाने नवीन कलाकार असूनही त्याला चित्रपटामध्ये घेतले आणि आता तो देशातील सगळ्यात मोठा सुपरस्टार झाला आहे. त्याला इथे अभिनेता म्हणून तयार करण्यात आलं आणि आता तो एक आदर्श अभिनेता बनला आहे. अशात त्याचे आणि यशराज फिल्म्सचं नातं नेहमी मजबूत राहिले आहे आणि आताही आधी सारखेच आहे.”

- Advertisement -

परिणीती चोप्राने देखील तोडलं होतं यशराज फिल्म्ससोबतचं नातं
रणवीर सिंह आणि यशराज फिल्म्सबाबत सांगताना सूत्रांनी सांगितलं की, जेव्हा पण त्यांना कोणता गमतीशीर प्रोजेक्ट मिळेल. रणवीर सिंह आणि यशराज फिल्म्स भविष्यात देखील काम करताना दिसून येतील. रणवीर आणि यशराज फिल्म्समधील नातं नेहमीच मजबूत राहिल. अभिनेत्री परिणीती चोप्राने देखील यशराज फिल्म्ससोबत आपला रस्ता वेगळा केला होता. परिणीती चोप्राने देखील ‘लेडीज वर्सेज रिक्की बहल’ या यशराज फिल्म्सच्या चित्रपटातून पदार्पण केले होते.

 


- Advertisement -

हेही वाचा :

मराठी रंगभूमी दीन ?… रंगकर्मींच्या चष्म्यातून…

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -