कार्तिक आर्यनच्या आगामी प्रोजेक्टसाठी साजिद नाडियाडवाला आणि कबीर खान आले एकत्र!

या अनटाइटल्ड प्रकल्पाद्वारे साजिद आणि कबीर पुन्हा एकदा एकत्र येत असून, या हिट चित्रपट निर्मात्याद्वारे अभिनेता कार्तिक आर्यनला पहिल्यांदा कधीही न पाहिलेल्या रूपात पाहणे मनोरंजक ठरेल.

बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी पुन्हा एकदा एक रोमांचक कास्टिंग केले असून कार्तिक आर्यनच्या मुख्य भूमिकेत ते त्यांचा आगामी महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. शीर्षक न ठरलेल्या या प्रकल्पाची सहनिर्मिती कबीर खान फिल्म्स करणार असून कबीर खान याचे दिग्दर्शन देखील करणार आहेत.

या अनटाइटल्ड प्रकल्पाद्वारे साजिद आणि कबीर पुन्हा एकदा एकत्र येत असून, या हिट चित्रपट निर्मात्याद्वारे अभिनेता कार्तिक आर्यनला पहिल्यांदा कधीही न पाहिलेल्या रूपात पाहणे मनोरंजक ठरेल.

विशेष म्हणजे, भूल भुलैया 2 च्या अभूतपूर्व यशानंतर कार्तिकची ही पहिली मोठी घोषणा आहे आणि अशा प्रकारे सुपरस्टारला आता दिग्दर्शक कबीर खान यांचा पाठिंबा आहे, ज्यांनी यापूर्वी बजरंगी भाईजान आणि 83 सह अनेक ब्लॉकबस्टरचे दिग्दर्शन केले आहे. तसेच, कबीर दुसऱ्यांदा साजिद नाडियाडवालासोबत काम करत आहे.

या प्रकल्पाचे तपशील गुप्त ठेवण्यात आले असले तरी, हा एक प्रचंड मनोरंजक चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. तीन दिग्गज अशा प्रकारे एकत्र येत असल्याच्या घोषणेने चित्रपट रसिकांमध्ये नक्कीच उत्सुकता निर्माण केली आहे.


हेही वाचा :सुप्रिया पाठारेंच्या मुलाचा ठाण्यातील कोकणीपाडा येथे पावभाजीचा ट्रक