घरमनोरंजनLockDown: सलमान - जॅकलिनचे 'तेरे बिना...' गाण लाँच!

LockDown: सलमान – जॅकलिनचे ‘तेरे बिना…’ गाण लाँच!

Subscribe

लॉकडाऊनमुळे पनवेलच्या फार्म हाऊसवर अडकून पडलेल्या बॉलीवूड कलाकार सलमान खानचं नवं कोरं तेरे बिना… गाणं नुकतच लाँच झाल आहे. या गाण्यात त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दिसत आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पनवेलमध्ये असलेल्या सलमानने नुकतेच हे गाणं चित्रीत केले असून त्यामुळे गाण्यातील सर्व लोकेशन हे पनवलेच्या फार्महाऊस आणि जवळपासच्या गावातील असल्याचे पाहालया मिळत आहे. तलाव, शेत, घोडे, मोकळं मैदान, रस्ते, जंगल असे वातावरण यामध्ये दिसून येत आहे. सलमान खानच्या कुटुंबियांसह काही कलाकार मंडळी आणि मित्र परिवारही या ठिकाणी उपस्थित असून त्यामध्ये जॅकलिनदेखील आहे. त्यामुळे या गाण्यात जॅकलिनला घेणे सहज शक्य झाले आहे. हे गाणं सलमान खानच्याच निर्मितीत बनले असून ते त्यानेच गायले आहे.

हेही वाचा – CoronaVirus: त्या आठ लसींवर WHO ची आशा टिकून; होऊ शकतो फायदा

- Advertisement -

 

- Advertisement -

प्यार करोना…

यापूर्वीही सलमान खानने लॉकडाऊनमध्ये असतानाच प्यार करोना… हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित केलं होत. यामध्ये कोरोना आजाराशी लढण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलिसांना त्याने हे गाणं समर्पित केलं होतं. तसेच अशा कठिण प्रसंगी प्रेम करा, आपुलकीने वागा, एकजूट रहा, संपर्क टाळा असे संदेश त्याने दिले होते. सलमान खानचा चाहता वर्ग मोठा आहे. भाईजानचे समर्थकही जास्त असल्याने सामाजिक भान राखून आपल्या चाहत्यांना सलमानने अनेकदा काही चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. वेळप्रसंगी लोकांची कान उघडणीही त्याने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -