घरमनोरंजनविवेक-अविवेकाचा लढा... संन्यस्त खड्ग

विवेक-अविवेकाचा लढा… संन्यस्त खड्ग

Subscribe

संन्यस्त खड्ग, या नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील आहे. एका अर्थाने हे पौराणिक नव्हे तर ऐतिहासिक नाटक आहे. सावरकरांनी एक निश्चित हेतू मनात धरून लिखाण केलेआहे . इथे त्यांचा रोख हा गौतम बुद्धाच्या जीवनतत्वाविषयी आदर व्यक्त करतानाच समकालीन गांधी तत्व आणि त्यातील त्रुटीवर टीका करणे असा स्पष्ट आहे. सावरकरांची बुद्धिनिष्ठ हिंदुत्व संकल्पना आणि कडवा राष्ट्रवाद, या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवून त्यांकडे पहायला हवे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व समजून घ्यायचा प्रयत्न त्यांच्या राजकीय, सामाजिक लेखनातून आणि काव्यातून करता येतो, तसाच तो त्यांच्या नाटकातूनही करता येतो. या दृष्टीने सध्या साहित्य संघातर्फे रंगमंचावर आलेल्या, अहिंसेविरूद्ध खल निग्रहणाचे महत्व सांगणाऱ्या ‘संन्यस्त खड्ग’कडे बघता येईल.  सावरकरांनी एक निश्चित हेतू मनात धरून लिखाण केलेआहे . इथे त्यांचा रोख हा गौतम बुद्धाच्या जीवनतत्वाविषयी आदर व्यक्त करतानाच समकालीन गांधी तत्व आणि त्यातील त्रुटीवर टीका करणे असा स्पष्ट आहे. सावरकरांची बुद्धिनिष्ठ हिंदुत्व संकल्पना आणि कडवा राष्ट्रवाद, या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवून त्यांकडे पहायला हवे.

संन्यस्त खड्ग, या नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील आहे. एका अर्थाने हे पौराणिक नव्हे तर ऐतिहासिक नाटक आहे. कपिलवस्तूचा इक्ष्वाकु कुलीन राजा शुद्धोधनपुत्र सिद्धार्थ, याने संन्यास घेतला आहे.  युद्धाआडून पशू आणि जीवांच्या हत्या सुरू आहेत, हे त्याला दिसते आहे. लोकांना यापासून परावृत्त करण्याचा मार्ग, म्हणजे नवा पंथ आणि विचार – हे समजून त्याने दीक्षा देण्यास सुरुवात केली आहे. शाक्य राज्यातील क्षत्रिय तरुण, दीक्षा घेत सुटले आहेत. अशाने आक्रमकांचा हल्ला झाल्यास राज्य वाचणे मुश्किल होईल अशी चिंता राज्याचा सेनापति विक्रमसिंह, शुद्धोधनाकडे बोलून दाखवतात.

- Advertisement -

दहा वर्षांनंतर सिद्धार्थ आपल्या वडिलांची भेट घेण्यास येत आहे. आपला राजमुकुट त्यास देऊन त्याचा कमंडलु स्वत:कडे घेण्याचा राजाचा मानस आहे. पण तिथे विक्रमसिंह आणि सिद्धार्थ यांच्यात विवाद होतो. या प्रसंगात सेनापतींच्या तोंडून लेखक बोलू लागतो आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा बिनतोड प्रतिवाद करतो. अहिंसेचे तत्व टिकणार नाही असे बजावत विक्रमसिंह सिद्धार्थाची साथ स्वीकारतो.

आता विक्रमसिंहाचा पुत्र  वल्लभ सिंह सेनापति होतो. तो आणि त्याची पत्नी सुलोचना नवखे असतानाच राज्यावर कोसलाधीश आक्रमण करतात. तरुणांनी संन्यासदीक्षा घेतल्याने कपिलवस्तूचा पाडाव निश्चित असतो. तो टळावा म्हणून विक्रमसिंहाच्या संन्यस्त खड्गाला आवाहन केले जाते. अहिंसेविरूद्ध हिंसेच्या या लढ्यात अखेर काय घडते, हा पुढील प्रवास, सावरकर आपल्या ‘सुष्टांच्या बचावासाठी हिंसा, या तत्वाचे महत्त्व स्पष्ट करतात.

- Advertisement -

प्रमोद पवारांनी हे मुळातील तीन अंकी नाटक- व्यवस्थित संपादित करून घेतले आहे. त्यांनी स्वत: एकेकाळी केलेली सिद्धार्थ ही भूमिका आता भरत चव्हाण करतात. त्यांची वाणी, उच्चार आणि फेक उत्तम आहे. सिद्धार्थचे तत्त्वज्ञान त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचते. संदीप सोमणांचा सेनापति विक्रम हा लेखकाचा आवाज आहे. त्यामुळे साक्षात भगवान बुद्धाच्या तत्वाचा, त्याला कुठेही कमीपणा येऊ न देता प्रतिवाद ते समर्थपणे करतात. सुधीर ठाकुर यांची प्रकाश योजना आणि नंदलाल रेळे यांचे पार्श्वसंगीत छान साथ देते.

या नाटकाचे संगीत मा. दीनांनाथांचे आहे आणि ते रंगमंचावर सादर करतात अमोल बावडेकर आणि संपदा माने, हे दोन तयारीचे गायक- कलाकार. अमोल यांनी वल्लभ सिंहाचा राग-लोभ, क्रोध, प्रेम अगदी सहजपणे दाखवले आहेत. त्यांना मोलाची साथ करत संपदा माने, आपण उत्तम गायिकाच नाही तर अभिनेत्री म्हणून देखील समर्थ आहोत हे दाखवून देते. या दोघांनी मिळून, मा. दीनांनाथांनी स्वरबद्ध केलेल्या सुंदर पदांना न्याय दिला आहे.  ‘मर्मबंधातली ठेव ही’, ‘शत जन्म शोधितांना’, ‘मर्मबंधातली ठेव ही’, ‘रती रंगी रंगे ध्यान’, ‘सुकतातची जगी’ या अशी पदे एका मागोमाग येऊ लागली की ती संगीत रसिकांसाठी मेजवानीच ठरते. त्याला तबल्याची साथ वैभव जोशी दाद देण्याजोगी करतात.मात्र या नाटकाचे प्रयोग सातत्याने व्हायला हवेत. ‘युद्ध हा धर्मच नव्हे. आक्रमण हा धर्म कसा काय होईल?’ आणि ‘शस्त्र युग जाऊन शास्त्र युग येवो’, हा त्यातील विचार आजही महत्त्वाचा आहे.

का पहावे? 
सावरकरांचे प्रगल्भ लेख, अमोल बावडेकर आणि संपदा माने यांचे उत्तम गायन.
******

निर्मिती : मुंबई मराठी साहित्य संघ नाट्यशाखा.
लेखक : स्वातंत्र्यवीर सावरकर ,दिग्दर्शक : प्रमोद पवार, संगीत : मा. दीनानाथ.
कलाकार : भरत चव्हाण, संदीप सोमण, आनंद पालव, शिवाजी रेडेकर, सुनील जोशी, सचिन नवरे, विलास आणि वैशाख माम्हणकर, विजय वारुळे, युवराज ताम्हनकर, श्रद्धा फाटक, संपदा माने आणि अमोल बावडेकर.


-आभास आनंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -