Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कोरोनाचा कहर मराठी सिनेमांवर, 'झिम्मा' चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर

कोरोनाचा कहर मराठी सिनेमांवर, ‘झिम्मा’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर

शासनाने आखून दिलेल्या निर्बंधाच पालन करत मराठी चित्रपटाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरस चा प्रसार गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असताना कोरोनाची दुसरी लाट आता जागोजागी पसरत आहे. अशातच चित्रपट सृष्टीलाही उतरती कळा लागली आहे. कोरोना व्हायरस फटका चित्रपटाच्या प्रदर्शनावर तसेच चित्रीकरणावर होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शासनाने शनिवार रविवार कडकं संचारबंदी लागू केली आहे. शासनाने आखून दिलेल्या निर्बंधाच पालन करत मराठी चित्रपटाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट “झिम्मा” च्या प्रदर्शनाची तारीख देखिल पुढे ढकलण्यात आली आहे.

- Advertisement -

तगडी स्टार कास्टअसलेल्या या चित्रपटात निर्मिती सावंत,सोनाली कुलकर्णी, सायली संजीव,सुचित्रा बांदेकर,सिद्धार्थ चांदेकर अश्या अनेक कलाकारांची वर्णी लागली आहे. याआधी हा चित्रपट २३ एप्रिल ला प्रदर्शित होणार होता. पण कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावामुळे याची प्रदर्शनाची तारीख लांबवण्यात आली आहे. अद्याप चित्रपट कधी प्रदर्शित होणार याचा खुलासा करण्यात आला नाहीये. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार हे सांगता येणे कठीण आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक निर्माते तसेच दिग्दर्शकांनी आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्म कडे वळवला आहे. तर काही बिग बजेट चित्रपट सिनेमागृह सुरू होण्याची आतूरतेने वाट पाहत आहेत.


हे हि वाचा – अक्षय कुमारचा कंगणाला सिक्रेट कॉल, थलायवीच्या ट्रेलरवर म्हणाला….

- Advertisement -