घरअर्थजगतPF खात्यात वर्षाला अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्यास भरावा लागणार कर;...

PF खात्यात वर्षाला अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्यास भरावा लागणार कर; जाणून घ्या…

Subscribe

भविष्य निर्वाह निधी म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड खात्यात वर्षाला अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्यास आता व्याजावर कर भरावा लागणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी असे देखील सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात कंपनीकडून पैसे जमा केले जात नसतील त्यांना वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर सूट मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या या निर्णयानंतर सामान्य नोकरदारांच्या मनात अधिक प्रश्न उपस्थितीत झाले आहेत. एकाच पीएफ खात्यात किती रकमेवर कर लागणार त्याचा नेमका फॉर्म्युला काय असेल?, वर्षभरानंतर कोणत्या रकमेवर किती व्याजापर्यंत सूट मिळणार आणि किती रकमेनंतर कर आकारला जाणार जाणून घ्या सविस्तर

ज्यांच्या खात्यामध्ये करासंदर्भात मर्यादेपेक्षा अधिक रक्कम जमा होत असेल, त्यांची एक नव्हे तर दोन पीएफ खाती असणं गरजेचं आहे. एका खात्यात आतापर्यंत कपात झालेली रक्कम आणि व्याजाची पूर्ण रक्कम राहणार आहे. या खात्यात जमा रक्कम किंवा त्यावर लागणारं व्याज करमुक्त असेल. तसेच जी रक्कम या मर्यादेपेक्षा अधिक असेल ती एका वेगळ्या खात्यात जमा केली जाणार आहे. या खात्यात जमा होणाऱ्या रकमेवर जे व्याज मिळेल, त्यावर दरवर्षी तुमच्या उत्पन्नाच्या स्लॅबनुसार कर आकारला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

तज्ज्ञांच्या मते, या नव्या बदलासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजे सीबीडीटीनं प्राप्तीकर आयकर १९६२ मध्ये बदल केला आहे. कर लागणारी रक्कम एका खात्यात आणि कर लागणार नाही अशी रक्कम दुसऱ्या खात्यात राहणार असल्याने खातेधारकांसाठी कराचा हिशेब करणं सोयिस्कर ठरणार आहे.


Tokyo 2020 Paralympics: देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; उंच उडीत प्रवीण कुमारला रौप्य पदक

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -