घरमनोरंजन'सनी'चा प्रयोग रद्द, दिग्दर्शक हेमंत ढोमे संतापला; मनसेचाही सरकारला अल्टिमेटम

‘सनी’चा प्रयोग रद्द, दिग्दर्शक हेमंत ढोमे संतापला; मनसेचाही सरकारला अल्टिमेटम

Subscribe

सनी चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे याने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

मुंबई – मराठी चित्रपटांना प्राइम टाइम न मिळणे, मराठी चित्रपटांचे शो रद्द करणे असे अनेक प्रकार याआधीही झाले आहेत. आता पुन्हा सनी या मराठी चित्रपटाबाबत हा प्रकार उघडकीस आला आहे. सनी चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे याने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

‘सनी’ या चित्रपटाचा शो कल्याणमधील एका थिएटरमध्ये लावण्यात आला होता. एका प्रेक्षकाने या शोसाठी तिकिटही बुक केले. मात्र, थिएटरकडून शो परस्पर रद्द करण्यात आला. याबाबत प्रेक्षकांनी हेमंत ढोमे याच्याशी संपर्क साधला. यावरून हेमंत ढोमे याने सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. तसंच, हा संतापजनक प्रकार केवळ एकाच ठिकाणी घडला नसून राज्यात अनेक ठिकाणी ‘सनी’चे शोज अचानक रद्द करण्यात आले आहेत, असंही सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा -‘सनी’ चित्रपटातील ‘तिरकीट जेम्बे हो’ गाणं प्रदर्शित

हेमंत ढोमे याने सोशल मीडियावर म्हटलंय की, ‘पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी… या राज्यात मराठी सिनेमासाठी जर आता एक शो मिळवायला झगडावं लागत असेल तर कठीण आहे! शुक्रवारी लागलेला सिनेमा दुसऱ्या दिवशी निघतोय! लोक सनी या चित्रपटाची तिकीटं काढतायत आणि शोज कॅन्सल केले जात आहेत! मराठी सिनेमासाठी कडक कायदा हवाच!’

- Advertisement -

‘थिएटरला प्रेक्षक येत नाहीत म्हणून शो रद्द करणे, कितपत योग्य आहे? एक प्रेक्षक जरी आला तरी शो दाखवला गेला पाहिजे. बुकिंग घेऊन नंतर प्रेक्षकांना शो रद्द झाल्याचे सांगून त्यांना पैसे देणे, हे चुकीचेच आहे. मग आपण प्रेक्षकांना तरी दोष कसा द्यायचा? काही प्रेक्षकांनी हे आमच्या निदर्शनास आणून दिल्याने हा प्रकार आम्हाला कळला. हे असेच सुरू राहिले तर चित्रपट चालणार कसे?’’ असा सवालही हेमंत ढोमे याने उपस्थित केला आहे.


हेमंत ढोमे याने याबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त करताच मनसे नेते गजानन काळे यांनीही उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, मनसे स्टाइल खळखट्याक करू असाही इशारा दिला आहे. ‘हे गांभीर्याने घ्यावे सरकारने. अन्यथा मनसे स्टाईल उत्तर मिळेल या सिनेमागृहांना. आणि सिनेमागृह चालक, मालक यांना माज आला आहे का? मराठी सिनेमाची गळचेपी सहन केली जाणार नाही, असा इशारा मनसे नेते गजानन काळे यांनी दिला आहे.


चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी केलेली तक्रार आणि मनसेने दिलेला अल्टिमेटम पाहून तरी सिनेमाचालक आता तरी मराठी चित्रपटांचे प्रयोग व्यवस्थित करतील, अशी आशा सामान्य प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा – प्रदर्शनापूर्वीच ललित प्रभाकरचा ‘सनी’ चित्रपट हाऊसफुल

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -