शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज

२६/११ च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात शहिद झालेले आर्मी ऑफिसर मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘मेजर’ असं नाव या चित्रपटाचे असून याचे ट्रेलर सुद्धा नुकतेच रिलीज झाले आहे. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या २६/११ च्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील पराक्रमाची आणि बलिदानाची आठवण काढत त्याचा सम्मान करण्यासाठी सलमान खान, महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारमन यांनी आपापल्या भाषेत या चित्रपटाचे ट्रेलर लाँन्च केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अभिनेता महेश बाबू याने हैदराबादमधील इवेंट दरम्यान या चित्रपटाचे ट्रेलर रिवील केले. पृथ्वीराज सुकुमारमन यांनी या चित्रपटाचे ट्रेलर मल्याळम भाषेत लाँन्च केले. अभिनेता सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या चित्रपटाचे ट्रेलर हिंदी भाषेत लाँन्च करत खाली कॅप्शनमध्ये “#MajorTheFilm चे ट्रेलर लाँन्च करताना मला खूप आनंद होत आहे. टीमला शुभेच्छा.” असं लिहिले आहे.

मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित
मेजर चित्रपटामध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या संपूर्ण आयुष्यावर आधारित असून संदीप उन्नीकृष्णन यांची मुख्य भूमिका अभिनेता आदिवी शेष याने साकारली आहे. चित्रपटात २६/११ च्या मुंबई आतंकवादी हल्ल्या दाखवलेला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक नक्कीच भावूक होतील.

३ जून रोजी ३ भाषांमध्ये रिलीज होणार चित्रपट
मेजर चित्रपटाचे दिग्दर्शन शशि किरण टिक्का यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये आदिवी शेष सोबत, शोभिता धूलिपाला, सई मांजरेकर, प्रकाश राज, रेवती आणि मुरली मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्श इंटरनॅशनल प्रोडक्शन आणि महेश बाबू यांच्या जीएमबी एंटरटेनमेंट यांनी मिळून केलेली आहे. संदीप उन्नकृष्णन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट ३ जून रोजी हिंदी, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.

 


हेही वाचा :‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला