घरमनोरंजनभाडिपाच्या लोकमंचावर रंगल्या औपचारिक गप्पा

भाडिपाच्या लोकमंचावर रंगल्या औपचारिक गप्पा

Subscribe

शेतकरी आंदोलनापासून ते राजकीय धोरणाबद्दल सडेतोड मत व्यक्त करतानाच शेतकऱ्यांच्या वेदना हुंकार सर्वसामान्यांपर्यंत पोहचणे गरजेचं असल्याचं प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले.

शेतकरी आंदोलनापासून ते राजकीय धोरणाबद्दल सडेतोड मत व्यक्त करतानाच शेतकऱ्यांच्या वेदना हुंकार सर्वसामान्यांपर्यंत पोहचणे गरजेचं असल्याचं प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले. भाडिपाच्या ‘लोकमंच’ या उपक्रमांतर्गत रंगलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलतं होते. राजकीय प्रश्नांपासून ते वैयक्तिक प्रवासाबाबत रंगलेल्या या औपचारिक गप्पांना दिलखुलास उत्तरे देत चळवळीच्या सामर्थ्याचे रहस्य त्यांनी याप्रसंगी उलगडले. दिल्लीप्रमाणे इतर राज्यांनीही स्वामिनाथन आयोगाने सुचविलेल्या शिफारशीची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली तर शेतकऱ्यांची दुर्देवाच्या फेऱ्यातून मुक्ती होईल, असे मत व्यक्त करतानाच आपले गुरु शरद जोशी यांच्या आठवणींना याप्रसंगी उजाळा दिला.

राजू शेट्टींनी दिली परखड उत्तर 

शेतकरी नेते शरद जोशी यांच्या प्रेरणेनेच मी राजकीय वाटचाल सुरु केली असं सांगतानाच २०१९ ची निवडणूक ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढली जाणार असून ही ताकद शेतकरी नेत्यांच्या एकजूटीसोबत चळवळीचीसुद्धा असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. शिवारातला शेतकरी  सुरक्षित राहिला तरच आपण सुरक्षित राहू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांचा उद्रेक समजून घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisement -

वैयक्तीक गोष्टींवरही केले भाष्य

निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर खास तरुण मतदारांसाठी सुरु करण्यात आलेल्या या चर्चात्मक कार्यक्रमात लेखनाच्या आवडीपासून ते अगदी महायुतीबाबतच्या निर्णयापर्यंत जनतेच्या मनातील सगळ्या प्रश्नांना बेधडक उत्तरं देत आपल्या मनातील सल व अनेक वैयक्तिक गोष्टी यावेळी खासादार राजू शेट्टी यांनी उलगडल्या. मी सर्वसामान्यांचा खासदार असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी माझा लढा सुरूच राहील हा निर्धार मुलाखतीच्या समारोपाला राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. अभिनेता पुष्कराज चिरपुटकर यांनी घेतलेली ही मुलाखत उत्तरोत्तर चांगलीच रंगली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -