Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन विराट-अनुष्काने घेतलं उज्जैनच्या महाकालचे दर्शन; व्हिडीओ व्हायरल

विराट-अनुष्काने घेतलं उज्जैनच्या महाकालचे दर्शन; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी आज बारा ज्योतिर्लिंगापैंकी एक असलेल्या मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील विश्व प्रसिद्ध महाकाल मंदिरामध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन सकाळी भस्म आरती आणि प्रार्थना केली. शिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक केला आणि पूजन केले.

या वेळी अनुष्काने हलक्या गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. तर विराटने शुभ्र धोतर नेसले होते. त्याने कपाळावर चंदन आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा देखील घातल्या होत्या.

- Advertisement -

सध्या त्यांचा मंदिरातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात मंदिराच्या बाहेरील परिसर दिसत असून गाभाऱ्याच्या बाहेर अनुष्का आणि विराट बसलेले दिसत आहेत. यावेळी गाभाऱ्यातून महादेवांची आरती सुरु असल्याचा आवाज देखील ऐकू येत आहे.

महादेवांच्या दर्शनानंतर अनुष्काला पत्रकारांना म्हणाली की, “आम्ही इथे प्रार्थना करण्यासाठी आलो आहोत आणि महाकालेश्वर मंदिरात आम्ही चांगले दर्शन घेतले आहे.” असं अनुष्का म्हणाली.

- Advertisement -

दरम्यान, यापूर्वी देखील विराट-अनुष्काने बाबा नीम करौली यांच्या दर्शनाला गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या मुलीसह जंगल सफारी देखील केली होती.

 

 


हेही वाचा :

राखी सावंतच्या आयुष्यावर येणार बायोपिक, स्वतःच साकारणार मुख्य भूमिका

- Advertisment -