Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ऑस्कर 2023 ची लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहाल?

ऑस्कर 2023 ची लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहाल?

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा सुरू होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. जगभरातील प्रेक्षक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 13 मार्चपासून हा प्रसारित होणार आहे. भारतीय चित्रपट ‘RRR’ मधील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर 2023 मध्ये ‘बेस्ट ओरिजिनल सॉन्ग’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

ऑस्कर 2023 कधी आणि कुठे पाहाल?

हा शो भारतात 13 मार्च रोजी सकाळी 5:30 वाजता Disney Plus Hotstar वर थेट प्रक्षेपित केला जाईल. ऑस्कर 2023 चे थेट प्रक्षेपण ABC नेटवर्कवर देखील तुम्ही पाहू शकता, तसेच हे YouTube, DirecTV, FUBOTV आणि Hulu Live TV या विविध प्लॅटफॉर्मवर पाहिले जाऊ शकते.

- Advertisement -

दरम्यान, यंदा भारतीय ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाला यात ‘बेस्ट ओरिजिनल सॉन्ग’ या श्रेणीसाठी नामांकन मिळाले आहे. अनेकजण हा पुरस्कार सोहळा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘नाटू नाटू’ या गाण्याचे संगीत एमएम कीरावानी यांनी दिले आहे.

ऑस्करमध्ये दिसणार दीपिका पादुकोण

‘RRR’ व्यतिरिक्त, इतर दोन भारतीय चित्रपटांना ‘बेस्ट शॉर्ट डॉक्यूमेंट्री फिल्म’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. बेस्ट शॉर्ट डॉक्यूमेंट्रीमध्ये कार्तिकी गोन्साल्विसचे ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ आणि शौनक सेनचे ‘ऑल दॅट ब्रेथ्स’ यांचा यात समावेश आहे. ऑस्कर 2023 चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यंदा बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील ऑस्करमध्ये दिसणार आहे. याबाबत दीपिकाने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन माहिती दिली होती.


- Advertisement -

हेही वाचा :

माधुरी दीक्षितला मातृशोक, आई-लेकीच्या नात्यातील जिव्हाळ्याचे क्षण पाहा!

- Advertisment -