घरमनोरंजन'कॉफी विथ करण ७'मध्ये तुला का नाही बोलावलं? या प्रश्नावर तापसीनं दिलं...

‘कॉफी विथ करण ७’मध्ये तुला का नाही बोलावलं? या प्रश्नावर तापसीनं दिलं सणसणीत उत्तर…नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Subscribe

तापसीच्या या उत्तरामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं. सध्या सोशल मीडियावर तिचं हे वक्तव्य खूप व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांच्या मते तापसीने अगदी बरोबर उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तित्या आगामी दोबारा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी करण जौहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. परंतु तापसी पन्नूला या कार्यक्रमात का बोलवण्यात आलं नाही? असं का झालं याबाबत एका इंटरव्यूमध्ये तापसीला प्रश्न विचारण्यात आला.

करणच्या शोमध्ये येण्यासाठी तापसी पन्नूला का नाही मिळालं आमंत्रण?
करण जौहरचा ‘कॉफी विथ करण ७’ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या चित्रपटाचं प्रोमोशन करण्यासाठी या शोमध्ये हजेरी लावली होती. इतकंच नव्हे तर करणने या शोमध्ये साउथच्या कलाकारांना देखील आमंत्रित केलेलं आहे. मागील काही दिवसांपूर्वी या शोमध्ये अक्षय कुमारसोबत अभिनेत्री समंथा रूथ प्रभू देखील आली होती. तर अनन्या पांडेसोबत लायगर चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी विजय देवरकोंडा देखील आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

- Advertisement -

दरम्यान, तापसीला तिच्या दोबारा चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तुला करण जौहरच्या शोमध्ये का बोलवण्या आलं नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तापसी म्हणाली की, “माझी सेक्स लाईफ एवढी सुद्धा मनोरंजक नाही की, त्यामुळे मला करणच्या शोमध्ये बोलवलं जाईल.” तापसीच्या या उत्तरामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं. सध्या सोशल मीडियावर तिचं हे वक्तव्य खूप व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांच्या मते तापसीने अगदी बरोबर उत्तर दिलं आहे.

तापसी झळकणार या चित्रपटांत
तापसी पन्नू लवकरच तिच्या ‘दोबारा’ चित्रपटामुळे दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केलेलं आहे. १९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त तापसी ‘डंकी’ चित्रपटामध्ये सुद्धा दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तापसी शाहरूख खानसोबत दिसून येईल.


हेही वाचा :भारताच्या इतिहास पहिल्यांदाच अमेरिकन गायिका मेरी मिलबेन होणार स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -