दादरच्या स्मृतिस्थळावरील बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले गुलमोहराचे झाड कोसळले

दादरच्या शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले आहे. रविवारी रात्रीच्या सुमारस मुंबईत जोरदार वारा आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे मुंबईतीली अनेक भागांत झाडे कोसळली.

दादरच्या शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले आहे. रविवारी रात्रीच्या सुमारस मुंबईत जोरदार वारा आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे मुंबईतीली अनेक भागांत झाडे कोसळली. विशेष म्हणजे यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले गुलमोहराचे झाड कोसळले. आज सकाळी मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्मृतीस्थळावर जाऊन पडलेल्या झाडाची पाहाणी केली. तसेच, बाळासाहेब ठाकरेंच्या या झाडाबाबत असलेल्या आठवणींना उजाळा दिला. (gulmohar tree colapsed in shiv sena balasaheb thackeray memorial at the Dadar shivaji park)

दादरच्या शिवाजी पार्कमधील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हे झाज कोसळले. झाड पडल्यामुळे स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे. याबाबत किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, “बाळासाहेबांच्या हस्तेच हे गुलमोहराचे झाड लावण्यात आले होते. रविवारी रात्री 11:15 वाजताच्या सुमारास हे झाड कोसळले. यामध्ये बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाच्या कुपणाचे नुकसान झाले. या झाडाची मुळ जिवंत आहेत. त्यामुळे या झाडाचे पुनर्रोपण केले जाते का याची तपासणी केली जाणार आहे”, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

“या परिसरात जवळपास आमदार आहेत. ज्यांचे बाळासाहेबार खूप प्रेम आहे. ते म्हणजे सदा सरवणकर. ते अगदी हाकेच्या अंतरावर राहतात. मात्र, झाड कोसळून सकाळ झाली तरी, अद्याप त्यांचा पत्ता नाही”, असा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी सदा सरवणकर यांना लगावला.

मुंबईत रविवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे मुंबईच्या अनेक भागांतील झाडे कोसळली. तसेच, काही ठिकाणी पाणी साचले होते. दरम्यान, मुंबईसह राज्यालाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कोकण, रत्नागिरीसह, मराठवाडा विदर्भालाही मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे.


हेही वाचा –  बंड झाले, आता थंड झाले? मनसेच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा