घरमनोरंजनव्हायोलिन म्हणजे जोग समीकरण आहे

व्हायोलिन म्हणजे जोग समीकरण आहे

Subscribe

आयुष्यभर कलेची सेवा केल्यानंतर वयाच्या एक ठरावीक टप्प्यावर एखादा बहुमान मिळावा असे प्रत्येक कलाकाराला वाटत असते. जीवनगौरव पुरस्काराची संकल्पना यातूनच पुढे आली. अनेकांना असे पुरस्कार वेगवेगळ्या संस्थांच्यावतीने देण्यातही आले; पण आता त्याहीपुढचा विचार करणारा समूह पुढे येऊ लागलेला आहे. अगदी मावळतीला लागल्यानंतर कलाकारांचा जीवनगौरव करण्यापेक्षा ज्या क्षेत्रात कलाकाराने ज्या कालखंडात उज्ज्वल यश मिळवलेले आहे, त्यावेळीच त्याचे कौतुक होणे गरजेचे आहे जेणेकरून आयोजक आपली दखल घेतात या एका हेतूने काम करण्याची ऊर्जा वाढते आणि स्वत:बरोबर कलेचा विकास तर होतोच, परंतु देशालाही अभिमान वाटू लागतो.

झी गौरव पुरस्कार यंदा वीसावे वर्षे साजरे करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीमध्ये योगदान देणार्‍या कलाकाराला अशा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत केले जाते. यंदा हा मान व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांना प्राप्त झालेला आहे. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात सर्वप्रथम संगीत नाटकांपासून झाली. त्याला कारण म्हणजे त्यांचे वडील संगीत नाटकाशी संबंधित होते. पुढे त्यांना आयुष्यभर चित्रपटासाठी काम केले. इतके काम केले की व्हायोलिन म्हणजे जोग हे समीकरणच झाले. त्यांच्या अनेक आठवणी उलगडून सांगितल्या जाणार आहेत. 31 मार्चला झी मराठीवर झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात ते पहायला मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -