घरफिचर्सदेशभक्तीचा ऑगस्ट उत्सव

देशभक्तीचा ऑगस्ट उत्सव

Subscribe

देशभक्तीच्या ऑगस्ट उत्सवाला येत्या आठवड्यात सुरुवात होतेय. ज्याचा शुभारंभ होतोय डिस्नी हॉटस्टारवर रिलीज होणार्‍या ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ सिनेमापासून... स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार्‍या या तीनही सिनेमांत एक गोष्ट कॉमन आहे, तीनही सिनेमांच्या कथा या भारताच्या 3 वेगवेगळ्या सैनिकांच्या शौर्यगाथेवर आहेत,ज्यांनी वेगवेगळ्या लढायांत आपलं अमूल्य योगदान दिलं आहे. अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर, नोरा फतेही आणि एमी विर्क सारख्या बड्या स्टारकास्टला घेऊन भुज बनविण्यात आलाय, ज्याची कथा 1971 सालच्या भारत पाकिस्तान युद्धातील एका प्रसंगावर आधारित आहे.

सेलिब्रेशन हा भारतीय समाजाचा स्वभाव आहे. घटना कितीही छोटी असो आपण त्याचं सेलिब्रेशन करतोच. सोशल मीडियाच्या युगात जिथे लग्नाची मंथ एनिवर्सरी साजरी करण्याचा ट्रेंड सुरू झालाय, तिथं राष्ट्रीय सण साजरा करतानाचा उत्साह हा सर्वांपेक्षा अधिक असणारच…15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणजे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि जल्लोषाचा दिवस आहे. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत असताना या उत्सवाला विशेष महत्व आहे, कोरोनाच्या काळात निर्बंध असले तरी सेलिब्रेशनमध्ये उत्साहात कुठलीही कमतरता नाही. हिंदी सिनेमा सामान्य प्रेक्षकांची नस ओळखणारा सिनेमा आहे असं म्हणतात, होळीला रिलीज होणार्‍या सिनेमात होळीची गाणी, दिवाळीला रिलीज होणार्‍या सिनेमात दिवाळीची गाणी असे अनेक प्रकार सिनेमाला प्रतिसाद मिळावा म्हणून केले जातात.

15 ऑगस्ट आणि सिनेमा याचंही एक वेगळं नातं आहे, लहानपणी स्वातंत्र्यदिनाचा एक शेड्युल ठरलेला असायचा, सकाळी शाळेतून ध्वजारोहण करून आलो की, स्टार गोल्डवर टँगो चार्ली, तो संपला की, यूटीव्हीवर बॉर्डर आणि संध्याकाळी झी सिनेमावर गदर असं फुलडे देशभक्तीचं पॅकेज त्यावेळी असायचं, जे आजही सुरूच आहे. आजही बॉलिवूडमध्ये सुपरस्टार लोकांनी आपआपले सण वाटून घेतलेत आणि त्याचप्रमाणे त्यांचे सिनेमे प्रदर्शित होतात. यात स्वातंत्र्यदिन अक्षय कुमारच्या वाट्याला आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अक्षय कुमार 15 ऑगस्टला आपले सिनेमे प्रदर्शित करतो. यावर्षीदेखील ‘बेलबॉटम’ नावाचा त्याचा सिनेमा प्रदर्शित होतोय, पण यावेळेत कथेत थोडा ट्विस्ट आहे. दरवर्षी 15 ऑगस्टला जास्तीत जास्त 2 मोठे सिनेमे रिलीज व्हायचे, ज्यात एक हिट ठरायचा. पण यावेळी मात्र तब्बल 3 मोठे सिनेमे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होणार आहेत. प्राईमवर सिद्धार्थ मल्होत्राचा ‘शेरशाह’, हॉटस्टारवर अजय देवगण, संजय दत्तचा ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ आणि थिएटर्समध्ये अक्षय कुमारचा ’बेलबॉटम’ येत्या इंडिपेडंन्स वीकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

- Advertisement -

देशभक्तीच्या ऑगस्ट उत्सवाला येत्या आठवड्यात सुरुवात होतेय. ज्याचा शुभारंभ होतोय डिस्नी हॉटस्टारवर रिलीज होणार्‍या भुज : द प्राईड ऑफ इंडिया सिनेमापासून… स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार्‍या या तीनही सिनेमांत एक गोष्ट कॉमन आहे, तीनही सिनेमांच्या कथा या भारताच्या 3 वेगवेगळ्या सैनिकांच्या शौर्यगाथेवर आहेत,ज्यांनी वेगवेगळ्या लढायांत आपलं अमूल्य योगदान दिलं आहे. अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर, नोरा फतेही आणि एमी विर्क सारख्या बड्या स्टारकास्टला घेऊन भुज बनविण्यात आलाय, ज्याची कथा 1971 सालच्या भारत पाकिस्तान युद्धातील एका प्रसंगावर आधारित आहे. भुज एयरपोर्टवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याला परतावून लावणार्‍या एयर फोर्स पायलट विजय कर्णिक यांची ही कथा आहे. ज्यात अजय देवगणने विजय कर्णिकची भूमिका साकारली आहे. कोरोनामुळे थिएटर्स बंद असल्याने हा सिनेमा डिस्नी हॉटस्टारवर रिलीज करण्यात येतोय. ज्याचा फार फटका निर्मात्यांना बसेल असं वाटत नाही. कारण या सिनेमाचे डिजिटल राईट्स तब्बल 112 कोटी रुपयांना हॉटस्टारने विकत घेतल्याची चर्चा आहे. उत्सवात जो दुसरा सिनेमा प्रदर्शित होणार आहे तो म्हणजे शेरशाह, धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला हा सिनेमा 1999 च्या कारगिल युद्धातील शूरवीर कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यात सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. कारगिल युद्धात विक्रम बत्रा यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन विष्णूवर्धन करतोय. सिनेमाचा ट्रेलर तर चांगलाच आहे, पण आता धर्मा प्रोडक्शन असल्याने या मुव्हीत लव्ह स्टोरी जास्त दिसू नये आणि जे घडलंय तेच बघायला मिळावं इतक्याच अपेक्षा या सिनेमाकडून आहेत.

ऑगस्ट उत्सवात सर्वाधिक चर्चिली जाणारी आणि सर्वाधिक अपेक्षा असणारी फिल्म आहे बेलबॉटम. हा सिनेमा खास का आहे? याची मुख्य 3 कारणं आहेत. पहिलं म्हणजे हा कोरोनानंतर हिंदीत चित्रपटगृहांत रिलीज होणारा पहिला मोठा सिनेमा आहे, हा सिनेमा 19 ऑगस्टला देशभरात रिलीज होणार आहे. जिथेजिथे थिएटर्स सुरू असतील तिथे प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायला मिळेल. मास्टरनंतर हा दुसरा मोठा सिनेमा असू शकतो जो कोरोना काळात चांगली कमाई करेल, यात अजून एक महत्वाची गोष्ट ही की, हिंदी सिनेमांना 30 टक्के बिजनेस देणार्‍या महाराष्ट्रात हा सिनेमा कोविड निर्बंधामुळे प्रदर्शित होणार नाही. अजून एक बाब म्हणजे हा सिनेमा थ्रीडीमध्ये बघता येणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बेलबॉटम फक्त 15 दिवसांसाठी थिएटरवर पाहता येणार आहे. कारण त्यानंतर हा सिनेमा अमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात येईल. ज्यासाठी प्राईमने तब्बल 45 कोटी रुपये निर्मात्यांना मोजले आहेत. आधी हा सिनेमा ओटीटीवरच प्रदर्शित होणार होता, पण नंतर निर्मात्यांनी थिएटरवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. बेल बॉटमबद्दल तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की, हा कोरोना काळात शूटिंग सुरू झालेला आणि संपवून रिलीज होणारा पहिला मोठा हिंदी सिनेमा आहे. ज्याचं शूटिंग स्कॉटलॅन्डमध्ये पूर्ण करण्यात आलंय. सिनेमाची कथा ही 80 च्या दशकात भारतात घडलेल्या प्लेन हायजॅकच्या काही घटनांपासून प्रेरित आहे. ज्यात बेलबॉटम निकनेम असलेल्या रॉ एजंटची भूमिका अक्षय कुमारने, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका लारा दत्त आणि बेलबॉटमच्या पत्नीची भूमिका वाणी कपूरने साकारली आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे हिंदी सिनेसृष्टीला मोठं नुकसान झालं आहे. इतकं नुकसान भरून काढण्यासाठी अजून किती काळ लागेल? हे कोणी सांगू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की, ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार्‍या या सिनेमांमुळे इंडस्ट्रीची चाकं पुन्हा रुळावर येऊ शकतात. खासकरून बेलबॉटम सिनेमाला चित्रपटगृहात मिळणार्‍या प्रतिसादावर खूप काही अवलंबून आहे, दीड वर्षांपासून सिनेमागृहात न गेलेल्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यात हा सिनेमा यशस्वी होतो का? थ्री डीमध्ये सिनेमा बघणं, महाराष्ट्र मुंबईमध्ये रिलीज न होता ही सगळीकडे रिलीज करणं, एक मोठी रिस्क होती जी बर्‍याच दिवसांनी हिंदी सिनेमातील निर्मात्यांनी घेतली आहे. हिंदी सिनेमाला आणि इंडस्ट्रीला झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी एका मोठ्या हिट सिनेमाची गरज आहे, कदाचित बेलबॉटम तो सिनेमा ठरू शकतो. असं घडलं तर एक वर्षांपासून रीलिजची वाट पाहणारे अनेक सिनेमे प्रदर्शित केले जाऊ शकतात. म्हणून हा देशभक्तीचा ऑगस्ट उत्सव कसा साजरा केला जातो, याला प्रतिसाद कसा मिळतो, त्यावरच इंडस्ट्रीतील नवीन प्रोजेक्ट अवलंबून आहेत. म्हणून देशभक्तीचा हा उत्सव या सिनेमांसह उत्साहात पार पडला तर कोरोनाच्या नुकसानातून इंडस्ट्रीला स्वातंत्र्य मिळेल हे नक्की..

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -