घरफिचर्समायमहानगर ब्लॉगराज्यपालांच्या पेढ्याचा शरद पवारांना राग का?

राज्यपालांच्या पेढ्याचा शरद पवारांना राग का?

Subscribe

शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात त्यांचा सहभाग कमालीचा असतो. 50 वर्षाहून अधिक काळ त्यांच्या राजकिय आयुष्याचा आहे. सत्तापदाचा काळ जास्तीत जास्त भोगणारं नेतृत्व ही त्यांची ओळख. ते बोलतात एक आणि करतात एक हा मुळ स्वभाव सर्वांना माहित. खरं तर त्यांच्या नेतृत्वावर काही लिखाण करण्याएवढी पात्रता आमच्या पेनाच्या शाईत नाही. पण अलीकडच्या काळात विशेषत: नव्या पिढीतले राजकारणी आपल्याच राज्यात त्यांना आवाहन देवु लागले. एव्हाना पराभुत करू लागले तर मग राग येणं शक्य आहे.

-राम कुलकर्णी

शरदचंद्र पवार कर्तेकरविता असलेलं महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झालं. सत्तांतरानंतर राज्यात भाजपाने पुढाकार घेवुन एकनाथ शिंदे जे मुळ शिवसेनेचे यांच्यासोबत बनवलं.अर्थात भाजपाला मध्यावधी निवडणुका लादायच्या नको होत्या. अडीच वर्षाची महाविकास आघाडी ठाकरे सरकारची काळीकुट्ट राजवट ज्यामध्ये राज्यातील शेतकरी, सामान्य माणुस एवढेच नव्हे तर हिंदुत्व वेशीवर टांगुन केवळ सत्तेसाठी लांगुनचालुन करणारे सरकार म्हणुन राजवटीचा लोकांना वैताग आला होता. ते घालवुन स्थिर सरकार यावं यासाठी एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेवुन हिंदुत्व रक्षणाची भुमिका घेतली. ज्याला भाजपाने पाठिंबा दिला. अवघ्या पंधरा दिवसात राजकिय उलथापालथीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. शरद पवारांना शह देवुन एवढ्या घडामोडीचा त्यांना राग येणे साहजिकच. नाही तरी पवार हे दुसरा पक्ष आणि नेत्यांच्या बाबत नेहमीच कोतं मन दाखवतात. काय तर म्हणे राज्यपालांनी शपथ देताना पेढा का भरवला? आणि 72 पासुन मला एकदाही पेढा मिळाला नाही. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची परंपरा बाहेरून राज्यात आलेले राज्यपाल पालन करीत असतील तर त्यात चुक काय? व्यक्तिद्वेषाच्या टिकेतुन आपणही किती खुनशी याचं ओंगळवाणं दर्शन त्यांच्या रागातुन जनतेला पहायला मिळालं.

- Advertisement -

शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात त्यांचा सहभाग कमालीचा असतो. 50 वर्षाहून अधिक काळ त्यांच्या राजकिय आयुष्याचा आहे. सत्तापदाचा काळ जास्तीत जास्त भोगणारं नेतृत्व ही त्यांची ओळख. ते बोलतात एक आणि करतात एक हा मुळ स्वभाव सर्वांना माहित. खरं तर त्यांच्या नेतृत्वावर काही लिखाण करण्याएवढी पात्रता आमच्या पेनाच्या शाईत नाही. पण अलीकडच्या काळात विशेषत: नव्या पिढीतले राजकारणी आपल्याच राज्यात त्यांना आवाहन देवु लागले. एव्हाना पराभुत करू लागले तर मग राग येणं शक्य आहे. 2019 ला राज्यात भाजप-शिवसेना युतीला जनतेचा सत्ता करण्याचा अधिकार मिळाला होता. पण त्याचवेळी क्रिकेटचे मैदान गाजवणार्‍या पवारांनी शिवसेनेला हाताशी धरून महाविकास आघाडीची स्थापना केली. अर्थात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या हाकेला संजयामार्फत बळी पडले. कदाचित आज अडीच वर्षापुर्वी केलेल्या अभद्र युतीचा पश्चाताप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निश्चित होत असेल. पण हिंदुत्वाच्या परिघापासुन दुर जावुन अगदी जी मंडळी रात्रंदिवस हिंदुत्ववाद्यांचा तिरस्कार करते. त्यांच्या मांडीला मांडी लावुन बसल्यानंतर अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व वेशीला टांगलं. राज्यात मताच्या राजकारणासाठी लांगुनचालुन करणार्‍यांच्या सोबत जावुन आपला मुळ अजिंडा बाजुला ठेवला. अर्थात पवारांना हे सारं घडवुन आणायचं होतं तो भाग वेगळा. भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेता म्हणुन काम करताना ठाकरे सरकारला सळो की पळो करून सोडलं. त्यांच्या प्रत्येक चुकावर हातोडा घालत सरकारची मनमानी चालु शकत नाही हे राज्याला दाखवुन दिलं. सत्ता असताना पंढरपुरची जागा जिंकली. कालपरवा राज्यसभा असो किंवा विधान परिषद त्यातही राजकिय चमत्कार दाखवुन भाजपाने यश मिळवलं. खरं तर राज्यसभेत आणि विधान परिषदेत भाजपाने दिलेले उमेदवार निवडुन आणुन दाखविले हाच खरा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा पवारांचा पराभव होय. एकनाथ शिंदेंच्या पुढाकाराने महाविकास आघाडीला वैतागुन गेलेले शिवसेनेचे 40 आमदार फुटले. स्वतंत्र गट झाला. गुजरात, गुवाहाटी, गोवा या सार्‍या घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे सरकार गेलं. राज्यात शिंदे-फडणवीस शाही आली. हा सगळा खेळ राजकीय दिग्गज असलेल्या पवारांच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर गेला असावा. राजकिय घडामोडीचा राग व्यक्त करता येईना म्हणुन की काय अगदी प्राथमिक शिक्षण घेणार्‍या शाळेतल्या मुलाप्रमाणे पवारांना राज्यपालांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना शपथ दिल्यानंतर पेढा भरवल्याचा राग आला. खरं तर या गोष्टीचं पवारांनी स्वागत केलं असतं तर अनेकांनी त्यांचं कौतुक केलं असतं. पण एवढ्या मोठ्या नेतृत्वाच्या अंगी मनाचा कोतेपणा कितपत खोलवर जावा? याचं दर्शन त्यांनीच जनतेला दाखवुन दिलं. ते म्हणाले, 1972 पासुन अनेकदा पदाच्या शपथा मी घेतल्या पण मला राज्यपालांनी पेढा भरवला नाही. राज्यपाला भगतसिंह कोशारी हे मुळचे उत्तराखंड हिंदी भाषिक. पण या ठिकाणी काम करताना महाराष्ट्रातील संस्कृतीला साजेल अशी भुमिका त्यांनी घेतली म्हणावी लागेल. अतिथी देवो भव ही आमची संस्कृती आहे. साधु संत वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र म्हणुन ओळखल्या जातो. पंढरपुरच्या विठोबाची आषाढी यात्रा सुरू आहे. एकमेकांचा आदर करून स्नेहभाव अलिंगन देवुन माऊली म्हणायची शिकवण पांडुरंगांनी सर्वांना दिली. त्या संस्कृतीची जोपासना करताना आपल्याकडे आलेल्या पाहुण्याचं तेही संवैधानिक सत्ता स्थापन करताना ज्यांना शपथ दिली त्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं तोंड गोड करून राज्यपालांनी महाराष्ट्रीयन संस्कृतीच जतन केलं तर पवारांच्या पोटात गोळा का? कदाचित टिव्हीसमोर बसलेल्या पवारांना या सार्‍या घडामोडीचा राग आला आणि तो त्यांनी राज्यपालाच्या पेढ्यावर काढला एवढाच अर्थ आपण काढु शकतो. 1972 पासुन त्यांना कुणी पेढा भरवला नाही. तत्कालीन काळात कदाचित असणार्‍या राज्यपालाचं मनही कंजुष असु शकेल. पण भगतसिंह कोशारी यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचं पेढा देवुन तोंड गोड केलं याचा अर्थ हे राज्य आणि राज्यातील जनतेचा गोडी गुलाबीने सांभाळ करावा एवढा निघु शकत नाही का? ज्या अडीच वर्षाच्या कारकीर्दीला जनता वैतागुन गेली तिथे आता सत्तापदाचा नविन सुर्य अंध:काराला दुर करून चांगलं काम करतील असाही संदेश असु शकतो. एक गोष्ट साहजिक मुळ पवारांचा स्वभाव दुसर्‍याचं काहीच देखवत नाही. बरं झालं त्यांनी फडणवीसांचा चेहरा बारिक होता एवढीच प्रतिक्रिया दिली. नाही तर नेहमीप्रमाणे जातीवर द्वेष करत पेशवे किंवा पगडी या शब्दाचा उच्चार करत टिका केली नाही. कारण यातही ते मागे कधीच रहात नाहीत. राज्यपालांनी भरवलेला पेढा याला जोडुन अतिथी देवो भव अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली असती तर आम जनतेनं स्वागत केलं असतं. पण द्वेषाचं राजकारण जेव्हा विचाराच्या भुमिकेत भिनलेलं असतं अशा वेळी वडिलोपार्जित नेतृत्वाकडून पालकाची भुमिका अपेक्षित असते. पण तसं न घडता व्यक्तिद्वेषाची भुमिका बाहेर पडते आणि मग राजकिय बालिशपणा पुढे येतो. तेव्हा भरवलेला पेढा याचाही राग अशा नेतृत्वाला येवु शकतो हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. वैचारिक पातळीवर भुमिका घेताना राजकिय संस्कृती सदृढ होण्यासाठी जबाबदार मंडळीकडून समाजात आपल्या कृतीतुन काही आदर्श निर्माण करण्याचं प्रकटीकरण होत असेल तर समाज मनावर त्याचे चांगले परिणाम होतात. राज्यपालांच्या पेढ्याचा राग पवारांना आला असेल पण महाराष्ट्रातील आम जनतेनं भरवलेल्या पेढ्याचे जोरदार स्वागत केलं.

(लेखक भाजपचे राज्य प्रवक्ते आहेत.)

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -