रंग बरसे!

Subscribe

आजही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या मोठ्या सिनेमात फेस्टिव्ह स्पेशल गाणी पाहायला मिळतात, त्या सिनेमांची रिलीज डेट देखील फेस्टिवलच्या आसपासची असते, यामागे दिग्दर्शकाचा उद्देश प्रेक्षकांना आकर्षित करणे असतो. तर प्रेक्षकांसाठी आपल्या फेस्टिवल स्पेशल प्लेलिस्टमध्ये नवीन गाणं अ‍ॅड करून ती वाढवणं हा असतो. उद्या देशभरात होळीचा उत्सव साजरा केला जाणार आहे, देशाच्या अनेक भागात तर गेल्या आठवडाभरापासूनच हा उत्सव साजरा करणं सुरू झालंय, रंगाच्या उत्सवासाठी स्पेशल प्लेलिस्ट देखील ठरलेली असेलच, याच होळी स्पेशल हिंदी गाण्यांची पार्श्वभूमी काय होती? ज्या फिल्म्समधून ही गाणी लोकप्रिय झाली त्यांचं पुढे काय झालं? रंग बरसे पासून ते वॉर सिनेमातील जय जय शिवशंकरपर्यंत अनेक हिट गाण्यांचा हा प्रवास नेमका कसा होता, याच प्रश्नांचा घेतलेला आढावा.

सेलिब्रेशन हे भारतीयांच्या मूळ स्वभावात आहे, काळ प्रसंग कुठलाही असो छोट्या गोष्टीतूनही आनंद शोधून तो साजरा करणे भारतीयांना चांगलेच ठाऊक आहे. भारतात जितके सण उत्सव साजरे केले जातात, तितके जगाच्या पाठीवर इतरत्र कुठे साजरा केले जात असतील असं वाटत नाही. म्हणून आपल्याकडच्या उत्सवांना एक वेगळं महत्व आहे. सेलिब्रेशन तर आहेच पण त्या सेलिब्रेशनसाठीची वेगळी बाजारपेठसुद्धा वेळोवेळी पाहायला मिळते. नाचून गाऊन सण साजरा करण्याची सवय असणार्‍या भारतीयांना त्या उत्सवासाठीची स्पेशल गाणी देखील लागतातच, म्हणून सुरुवातीपासून आपल्याकडील हिंदी सिनेमांमध्ये अशा फेस्टिवल स्पेशल गाण्यांचा समावेश केला जातो. अगदी 1950 पासून ते आजतागायत उत्सवांचे रूप बदलले तरी सेलिब्रेशन मध्ये काही बदल झाला नाही. 90 नंतरच्या काळात अनेक गँगस्टर सिनेमांमध्ये गणपती स्पेशल गाणी पाहायला मिळालीत, काहींमध्ये दिवाळी आणि होळीस्पेशल गाणी देखील आहेत.

आजही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या मोठ्या सिनेमात अशी फेस्टिव्ह स्पेशल गाणी पाहायला मिळतात, त्या सिनेमांची रिलीज डेट देखील फेस्टिवलच्या आसपासची असते, यामागे दिग्दर्शकाचा उद्देश प्रेक्षकांना आकर्षित करणे असतो. तर प्रेक्षकांसाठी आपल्या फेस्टिवल स्पेशल प्लेलिस्टमध्ये नवीन गाणं अ‍ॅड करून ती वाढवणं हा असतो. उद्या देशभरात होळीचा उत्सव साजरा केला जाणार आहे, देशाच्या अनेक भागात तर गेल्या आठवडाभरापासूनच हा उत्सव साजरा करणं सुरू झालंय, रंगाच्या उत्सवासाठी स्पेशल प्लेलिस्ट देखील ठरलेली असेलच, याच होळी स्पेशल हिंदी गाण्यांची पार्श्वभूमी काय होती? ज्या फिल्म्समधून ही गाणी लोकप्रिय झाली त्यांचं पुढे काय झालं? रंग बरसे पासून ते वॉर सिनेमातील जय जय शिवशंकरपर्यंत अनेक हिट गाण्यांचा हा प्रवास नेमका कसा होता, याच प्रश्नांचा घेतलेला आढावा.

- Advertisement -

बॉलिवूडमध्ये होळी म्हटलं की, सर्वात आधी आठवतो गब्बर सिंगचा डायलॉग होली कब है? कब है होली? वाला, शोले सिनेमात होळीचा एक सिन आहे जो बराच लोकप्रिय ठरला होता. गब्बर सिंग आणि त्याची संपूर्ण गँग रामगडवर हल्ला करण्याआधी तिथे एक गाणं दाखवलंय, जे 90 च्या दशकापर्यंत बरंच गाजलं, आजही काही ठिकाणी होळीच्या उत्सवात हे गाणं ऐकायला मिळतं. होली के दिन दिल खिल जाते है किशोर कुमार आणि लताजींच्या आवाजातील या गाण्याला त्यावेळी प्रत्येक होळी सेलिब्रेशनचा भाग बनवला जायचे. जसं गोष्टीच एक वय असतं, तसं प्रत्येक गाण्यांचा देखील एक काळ असतो आणि त्या काळातील रसिकांनाच ती गाणी आवडत असतात, आजच्या काळात 70 च्या दशकातील सगळीच गाणी आवडतील असं नाही. याला काही गाणी अपवाद आहेतच, पण तरीही त्या गाण्यांचा एक रसिक होता एक काळ होता.

जेव्हा त्यांना लोकप्रियता मिळाली. होळीची गाणी म्हंटली की, आपल्याला काही गाणी आपसूकच आठवतात, त्यातही अमिताभ बच्चनची गाणी लोकप्रिय आहेत. त्यांनी गायलेली रंग बरसे आणि होली खेले रघुबीरा अवध में ही दोन्ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. शोले, सिलसिला, यासोबतच कटी पतंग मधले आज ना छोडेंगे मशाल मधलं ओ देखो होली आई आणि डर सिनेमातलं अंग से अंग लगाना ही 2000 सालच्या आधीची काही लोकप्रिय होळी विशेष गाणी होती. ज्यापैकी सिलसिला आणि कटी पतंग सिनेमातलं गाणं आजही आपल्या स्मरणात आहे. पण होळीच्या गाण्याची सुरुवात सिलसिला किंवा शोलेपासून झाली नव्हती, हिंदी सिनेमात होळीच्या पहिल्या गाण्याचा संदर्भ हा 1950 सालच्या जोगन नावाच्या सिनेमात आढळतो, संत मीराबाईच्या जीवनावर आलेल्या या सिनेमात डारो रे रंग रसिया नावाचं एक होळी विशेष गाणं आहे. नंतर मदर इंडिया, आण, नवरंग, इन्सानियत अशा अनेक जुन्या हिंदी सिनेमांमध्ये होळी स्पेशल गाणी आहेत.

- Advertisement -

2000 नंतरच्या काळात दरवर्षी किमान एक तरी मोठा सिनेमा आहे, ज्यात होळी किंवा गणपती स्पेशल गाणी असतील. जुन्या गाण्यांचे रिमेक म्हणा किंवा डिस्को टाईप गाणी म्हणा, प्रकारात बदल झाला असला तरी संख्येत मात्र कुठलीही घट झालेली नाही. यातही 2010 नंतर मोठा बदल घडून आला आहे, बिग बजेट सिनेमांना सुरुवात झाल्यानंतर गाणीदेखील तितकीच भव्य दिव्य पाहायला मिळालीत. आधीच्या काळात अमिताभच्या सिनेमात होळीशी संबंधित गाणी पाहायला मिळायची, तसंच गेल्या काही काळात अक्षय कुमार आणि संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात अशी गाणी पाहायला मिळतात. डू मी ए फेव्हर लेट्स प्ले होली या वक्त सिनेमातील गाण्यानंतर अलीकडच्या काळात आलेल्या जॉली एल एल बी 2 मधील गो पागल आणि टॉयलेट एक प्रेमकथा मधील लठ मार ही गाणी देखील बरीच गाजली.

संजय लीला भन्साळी आपल्या फिल्म्ससह त्याच्या भव्य दिव्य सेट्ससाठी इंडस्ट्रीमध्ये ओळखला जातो, त्याच्या ही अनेक सिनेमात होळीशी संबंधित गाणी आहेत. फक्त संजय लीला भंसालीच्या सिनेमात असलेल्या होळीच्या गाण्यांमध्ये आणि इतर गाण्यांमध्ये एक फरक आहे. संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमातील होळीची गाणी ही नाचण्यासाठी बनलेली नाहीत. कथेत त्यांना एक वेगळं स्थान आहे, बाजीराव मस्तानी, रामलीला, पद्मावत अशा अनेक सिनेमात त्यांनी होळीची गाणी किंवा त्या प्रसंगावर आधारित गाणी टाकली आहेत. रामलीला मधले अंग लगा दे आणि लहू मुह लग गया या दोन्ही गाण्यांमध्ये होळीचा उत्सव दाखवण्यात आलाय. ही दोन्ही गाणी बरीच गाजली, नंतरच्या काळात आलेल्या बाजीराव मस्तानी सिनेमात देखील रंगावर आधारित एक गाणं आहे, जेव्हा मस्तानी बाजीराव समोर मोहे रंग दो लाल म्हणत नृत्य करते. पद्मावत सिनेमात तर होळी या शीर्षकाखाली रिचा शर्मा यांनी गायलेले एक गाणे आहे, ज्याला शास्त्रीय संगीताची जोड मिळाल्याने ते अधिक श्रवणीय झालं.

हिंदी सिनेमांमध्ये होळीची गाणी केवळ नाचण्यासाठी दाखवलेली नाहीत हे देखील सत्य आहे. संजय लीला भन्साळी आणि अक्षय कुमारच्या अलीकडच्या काळातील सिनेमात असलेल्या गाण्याकडे पाहिले तर ही बाब लक्षात येईल. भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने होळीचा उत्सव साजरा केला जातो, काही भागात तर 8 दिवस आधीपासूनच या उत्सवाची तयारी सुरू असते.विशेषतः उत्तर भारतात होळीचा उत्सव तुलनेने अधिक असतो, मथुरा वृंदावन असो किंवा गुजरात, राजस्थान प्रत्येक भागात हा उत्सव साजरा करण्याची वेगळी पद्धत आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास, अक्षय कुमारच्या टॉयलेट सिनेमात असलेल्या गोरी तू लठ मार या गाण्यात उत्तर प्रदेशातील काही भागात साजरा केल्या जाणार्‍या, लठमार होळीचा उत्सव दाखवण्यात आला आहे.

बद्रिनाथ की दुल्हनियाँमध्ये झांसी, जॉली एल एल बी 2 मध्ये लखनौ, पद्मावतमध्ये राजस्थान, रामलीला मध्ये गुजरात अशा विविध सिनेमातील होळीच्या गाण्यांमध्ये त्या त्या भागातील होळीचा उत्सव साजरा करताना दाखवण्यात आला आहे. अनेक सिनेमात तर गरज नसताना केवळ प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आता फेस्टीवल स्पेशल गाणी मुद्दामहून घातली जातात. वॉर सिनेमातील जय जय शिवशंकर हे गाणं देखील त्यापैकी एकच, पण काही मोजके अपवाद वगळता हा ट्रेंड चांगलाच गाजला आहे. या गाण्यांव्यतिरिक्त अजूनही काही गाणी आहेत, ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय आपल्या होळी स्पेशल गाण्यांची यादी पूर्ण होऊ शकणार नाही. मंगल पांडे सिनेमातील देखो आई होली, रांझना सिनेमातील तुम तक, ये जवानी है दिवानीमधील बलम पिचकारी, पटाखा सिनेमातील गली गली आणि इला अरुण यांच्या आवाजातील होलिया मे उडे रे गुलाल ही काही गाणी आहेत ज्यांच्याशिवाय होळीचा उत्सव पूर्ण होऊ शकत नाही.

कोरोनाच्या काळात अनेक निर्बंधांमुळे होळीच्या सेलिब्रेशनवर पूर्णविराम लागला असला, तरी उत्साहात मात्र कमतरता झालेली नाही आणि जोपर्यंत उत्सवाच्या सेलिब्रेशनला पूर्ण करणारी अशी गाणी आहेत, तोपर्यंत होळीच्या उत्साहात कुठलाच खंड पडणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -