Vastu Tips : आठवड्याच्या प्रत्येक वारानुसार वापरा ‘हे’ रंग; अन् पाहा चमत्कार

शास्त्रात वारानुसार रंग वापरण्याचे महत्त्व सुद्धा सांगण्यात आलं आहे. यामुळे आपल्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडू शकतात. शिवाय रंगांशी संबंधित ग्रह देखील आपल्यावर खुश होतात. ज्यामुळे आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचा त्रास आपल्याला जास्त प्रमाणात भोगावा लागत नाही.

आठवड्यातील प्रत्येक वाराचं विशेष महत्त्व आहे, हिंदू धर्मात देवतांना आणि ग्रहांना आठवड्यातील प्रत्येक वार समर्पित केलेला आहे. त्या त्या वारानुसार देवतांची आणि ग्रहांची पूजा-आराधना केली जाते. त्याबरोबरच शास्त्रात वारानुसार रंग वापरण्याचे महत्त्वसुद्धा सांगण्यात आलं आहे. यामुळे आपल्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडू शकतात. शिवाय रंगांशी संबंधित ग्रह देखील आपल्यावर खूश होतात. ज्यामुळे आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचा त्रास आपल्याला जास्त प्रमाणात भोगावा लागत नाही.

त्याबरोबरच प्रत्येक दिवस उत्साहात जातो आणि आपल्यावर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त होतो.

कोणत्या दिवशी कोणता रंग वापराल?

रविवार
रविवार हा आठवड्याचा पहिला दिवस आहे, हा सूर्याचा वार असल्यामुळे या दिवशी सूर्याचा रंग म्हणजे केशरी, तांबूस पिवळा हे रंग वापरावे, जेणेकरून तुमच्यावर सूर्यदेवाची कृपा प्राप्त होईल. ज्यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्य आणि पद-प्रतिष्ठा प्राप्त होईल. तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य अशुभ स्थितीत असेल तर, तुम्ही प्रत्येक रविवारी हे रंग वापरा.

सोमवार
सोम म्हणजे चंद्र त्यामुळे सोमवार हा चंद्र ग्रहाचा वार आहे, तसेच सोमवारी भगवान शंकरांची पूजा-आराधना करण्याची मान्यता आहे. या दिवशी पांढऱ्या रंगाचे किंवा लाइट रंगाचे कपडे घालावे, यामुळे तुम्हाला चंद्र आणि भगवान शंकरांची कृपा प्राप्त होईल.

मंगळवार
मंगळवार हा मंगळ ग्रहाचा वार आहे , शिवाय या दिवशी भगवान हनुमान यांची आराधना केली जाते. भगवान तसेच हनुमान आणि मंगळ ग्रहाला लाल रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी लाल रंग वापरावा, यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल.

बुधवार
बुधवार हा बुध ग्रहाचा वार असून या दिवशी बुद्धीच्या देवतेची म्हणजेच भगवान गणेशांची उपासना केली जाते, शास्त्रात या दिवशी हिरवा रंग वापरण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून तुम्हाला धनप्राप्ती होईल शिवाय तुमच्या बुद्धिमत्तेचा विकास होईल.

गुरुवार
गुरुवार हा गुरू ग्रहाचा वार आहे, तसेच या दिवशी भगवान विष्णू आणि दत्तात्रयांची उपासना केली जाते. या दिवशी पिवळा रंग वापरण्याचे विधान आहे, या रंगाच्या वापराने आयुष्यात सुख प्राप्त होते.

शुक्रवार
शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा वार असून, या दिवशी देवी लक्ष्मी, दुर्गा यांची पूजा-आराधना केली जाते. शास्त्रात या दिवशी हलका गुलाबी, क्रिम तसेच पांढरा रंग वापरण्याची माहिती दिलेली आहे. तसेच या रंगाच्या वापराने पती-पत्नीमधील नातं घट्ट होते.

शनिवार
हा शनि देवांचा वार असून, या दिवशी काळा आणि निळा हे दोन रंग वापरण्याचे विधान आहे, तसेच या दिवशी काळा आणि निळा रंग वापरल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्या आसपास येत नाही. मात्र, कोणत्याही पूजेत काळा आणि निळा रंग वापरू नये.


हेही वाचा : Vastu Tips : घरात कापूर जाळण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व…