घरलाईफस्टाईलना जिम ना वर्क आऊट, फक्त फिस्ट डाएटने करा 'वेट लॉस'

ना जिम ना वर्क आऊट, फक्त फिस्ट डाएटने करा ‘वेट लॉस’

Subscribe

वजन कमी कारण्यासाठी आणखी एक डाएट आहे जे तुम्हाला उपयोगी पडू शकतं. 'फिस्ट डाएट' हे असं डाएट आहे जे तुमचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतं.

सध्याचे धावपळीचे आयुष्य आणि कामाची गडबड यामध्ये आपल्या आहाराची काळजी घेणे गरजेचं गरजेचे असते. काही जणांचे काम हे सतत लॅपटॉप बसून करायचे असते त्यामुळे लठ्ठपणा सुद्धा वाढतो. आणि मग वाढलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी बरेच जण डाएटचा आधार घेतात. वजन कमी कारण्यासाठी आणखी एक डाएट आहे जे तुम्हाला उपयोगी पडू शकतं. ‘फिस्ट डाएट’ हे असं डाएट आहे जे तुमचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतं. जाणून घ्या काय आहे ‘फिस्ट डाएट’.

हे ही वाचा – दुर्मीळ, चविष्ट आणि हेल्दी पावसाळी रानभाज्या

- Advertisement -

हे ही वाचा –  नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून…

फिस्ट डाएट :

- Advertisement -

फिस्ट डाएट म्हणजे एक असे डायट ज्यामध्ये तुम्ही तुमच्या शरीरासाठी जेवढ्या कॅलरीज योग्य आहेत तेवढ्या कॅलरीजचे अन्नपदार्थ तुम्ही सेवन करून तुमचा वजन कमी करू शकता. यामध्ये तुम्ही दिवसातून तीन वेळा जेऊ शकता किंवा अन्नपदार्थ खाऊ शकता. पण यामध्ये एक गोष्ट पाळली पाहिजे की तुम्ही जे अन्नपदार्थ खाता त्यामधून प्रोटीन, फायबर आणि इतर पोषक घटक मिळाले पाहिजेत. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा समावेश होतो. या डाएटचे पालन केल्यामुळे व्यक्ती प्रत्येक आठवड्यात ४०० ते ९०० ग्रॅम वजन कमी करू शकतो

हे ही वाचा – धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचेच राहील, संजय राऊतांचा दावा

फिस्ट डाएट मध्ये कोणत्या गोष्टी खाणे टाळले पाहिजे :

तुम्ही कोणतेही डाएट जेव्हा फॉलो करत असता तेव्हा त्याचे काही नियम तुम्हाला पाळावे लागतात. जर का तुम्ही एखादं डाएट करत असता आणि इतरही काही पदार्थ खात असाल तर तुम्हाला त्या डाएटचे चांगले परिणाम दिसणार नाहीत. फिस्ट डाएट करताना मिठाई, चॉकलेट आणि फास्ट फूडचे सेवन करणे टाळा.

हे ही वाचा – ब्युटी प्रॉड्स्टस खरेदी करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

फिस्ट डाएट करत असताना व्यायामही करणे गरजेचे आहे का ?

जेव्हा तुम्ही फिस्ट डाएट करता तेव्हा तुम्हाला व्यायाम किंवा कसरत करण्याची गरज नाही. पण तज्ञ व्यायाम सुदृढ शरीरासाठी व्यायाम करण्याचा सल्ला देतात. जर का तुम्ही या डाएट सोबत नियम आणि योग्य व्यायाम सुद्धा केला तर त्याचा परिणाम तुम्हाला लवकर दिसेल.

हा तही वाचा – थंड दूध पिणंही आरोग्यदायी आहे, ‘हे’ आहेत फायदे

या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला फक्त माहिती दिली आहे. तुम्हाला या संदर्भांत माहिती घ्यायचची असेल तर तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -