घरमहाराष्ट्रसायंकाळी सहा ते आठ टीव्ही आणि मोबाईल बंदी, मुलांच्या अभ्यासासाठी ग्रामपंचायतीचा ठराव

सायंकाळी सहा ते आठ टीव्ही आणि मोबाईल बंदी, मुलांच्या अभ्यासासाठी ग्रामपंचायतीचा ठराव

Subscribe

मुलांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी गावातील शिक्षक, मुलांचे पालक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मुलांचे अभ्यासावर लक्ष राहावे आणि प्रगती व्हावी या हेतुने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई – मुलांना मोबाईलच्या व्यसनातून बाहेर काढण्याकरता यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बान्सी गावात शालेय मुलांसाठी मोबाईल बंदी आणण्यात आली. आता असाच निर्णय उस्मानाबादमधील जकेकूरवाडी ग्रामपंचायतीने घेतला आहे. या गावात सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईल आणि टीव्ही बंदीची आठवण दररोज भोंग्याच्या माध्यमातून देण्यात येते.

हेही वाचा – पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी; उमेदवारांची मागणी

- Advertisement -

लॉकडाऊन काळात सगळं ठप्प झालेलं असताना मोबाईलच्या व्यसनाचा अतिरेक पाहायला मिळाला. शाळा, कॉलेजचा अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवू लागल्याने मुलांचा स्क्रीन टाईम वाढला. तसंच, टीव्हीवरील मालिका पाहण्याचीही सवय जडली. आता कोरोनापश्चात या सवयी आजही कायम राहिल्याने मुलांच्या अभ्यासावर परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे ग्रामसभेत ठराव मंजूर करत सायंकाळी सहा ते रात्री आठ दरम्यान घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात मुलांना घराबाहेर पडण्यासही मनाई करण्यात आली आहे. मुलांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी गावातील शिक्षक, मुलांचे पालक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मुलांचे अभ्यासावर लक्ष राहावे आणि प्रगती व्हावी या हेतुने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा – कंटनेर भरून खोके कुणाकडे गेले हे सर्वांना माहित; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका

- Advertisement -

बान्सी गावातही असाच निर्णय

पुसद तालुक्यातील साग जंगलाला लागून असलेल्या बान्सी गावात ११ नोव्हेंबर रोजी असाच ठराव पास झाला होता. यानुसार, किशोरावस्थेतील नवीन पिढी मोबाईल फोनच्या आहारी गेली आहे. त्याचे परिणाम दिसत असल्याने ग्रामपंचायतीने महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार अठरा वर्षांखालील मुला मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा – …तर उठाव होणारच, राज्यपालांविरोधात संभाजीराजे आक्रमक

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -