घरमहाराष्ट्रमेळघाटात दीडशे फूट जीप कोसळली; चौघांचा जागीच मृत्यू, आठ जण जखमी

मेळघाटात दीडशे फूट जीप कोसळली; चौघांचा जागीच मृत्यू, आठ जण जखमी

Subscribe

अमरावती जिल्ह्यातील अकोट येथून मेळघाटच्या धारणी तालुक्यातील सुसर्दा येथे हे वाहन जात असताना राणीगावा जवळील दरीत हा अपघात घडला. जखमींना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. 

भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एका भरधाव जीपचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जीप थेट दीडशे फूट दरीत कोसळली. या अपघातात चारजण ठार तर आठ जण जखमी जाले आहेत. तर, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील अकोट येथून मेळघाटच्या धारणी तालुक्यातील सुसर्दा येथे हे वाहन जात असताना राणीगावा जवळील दरीत हा अपघात घडला. जखमींना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – 2024 च्या अखेरीस देशातील रस्ते अपघातांची संख्या निम्म्यावर येईल; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा

- Advertisement -

धारणी तालुक्यातील सुसर्दा येथे बुधवारी आठवडे बाजार भरतो. या तालुक्यातील हा सर्वांत मोठा आठवडी बाजार असल्याने आजूबाजूच्या गावातील अनेक शेतकरी येते आपला भाजीपाला विकण्यासाठी येत असतात. त्याप्रमाणे अकोट हिवरखेड येथील काही शेतकरीही या बाजारपेठेत भाजीपाला विक्रीसाठी येतात. बाजार संपल्यानंतर सायंकाळी घर परतत असताना राणीगावनंतर असलेल्या एका जंगलातील घाटवळणाच्या उतार रस्त्यावर हा अपघात घडला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट दीडशे फूट दरीत कोसळली. यावेळी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

हेही वाचा – बुलडाण्यात ट्रकची एसटी बसला जोरदार धडक; अपघातात 12 प्रवासी जखमी, 5 गंभीर

- Advertisement -

चालक केशव बनसोड, सय्यद समशेर या दोघांचा मृत्यू झाला आहे. इतर दोघांची अद्यापही नावे समजू शकले नाहीत. तसेच, शरीफ खान, सरदार खान रेडिमेड वाले (३८), जरीफ खान शब्बीर खान चाबीवाले (३२), प्रफुल हरोडे ऊर्फ पिंटू (५०), समीर बेग अकबर बेग (३५), श्रीकृष्ण श्यामराव कोथडकर (४७), सय्यद जाफर (४०, सर्व रा. अकोट व हिवरखेड) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -