घरमहाराष्ट्रराज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला; पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचे, हवामान खात्याकडून...

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला; पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचे, हवामान खात्याकडून अंदाज

Subscribe

दरम्यान पुढल्या काही तासांमध्ये राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यतील मुंबई(mumbai), ठाणे(thane), पुणे, सातारा,सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, लातूर या भागात पाऊस झाला आहे. तर येत्या तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रसह घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यात(maharashtra monsoon) जुलै महिन्यात सर्वत्र पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. राज्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पुअर पूरपरिस्थिती निर्माण झाली. काही जिल्यांमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं. त्यामुळेच जनजीवन सुद्धा विस्कळीत झालं होतं. गेल्या आठवड्याभरापासून पावसाने उसंत घेतली होती. पण आता राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू लागल आहे. राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

हे ही वाचा – Monsoon Update : कोकणात नैऋत्य मान्सूनची हजेरी, हवामान विभागाची माहिती

- Advertisement -

दरम्यान पुढल्या काही तासांमध्ये राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यतील मुंबई(mumbai), ठाणे(thane), पुणे, सातारा,सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, लातूर या भागात पाऊस झाला आहे. तर येत्या तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रसह घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान राज्याच्या काही भागात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर मराठवाडा आणि विदर्भाला या पावसाचा सर्वाधिक फाटक बसला. अनेक ठिकाणी शेती सुद्धा नुकसान झालं. राज्यात जवळपास आठ लाख हेक्टरहुन जास्त क्षेत्रात पिकांचे नुकसने झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

हे ही वाचा – Monsoon 2022 : पुढील 48 तासात मान्सून कोकणात होणार दाखल, हवामान विभागाची माहिती

- Advertisement -

धुळे(dhule) जिल्यातील पावसाचा आढावा घ्यायचा झल्यास, गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. असं असलं तरी अद्याप शासनाकडून निकसान झालेल्या भागाचे पंचनामे सुरु करण्यात आलेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसते आहे. धुळे जिल्यात आतापर्यंत १०३ टक्के एवढा पाऊस झाला आहे. तर धुळ्यातील साक्री तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात अत्यंत कमी पावसाची नोंद झाली.

धुळे जिल्यातील शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा चिमठाणे तर शिरपूर तालुक्यातील जवखेडा होळनाथे या कमी पाऊस झालेल्या भागात उन्हाचा कडाका वाढल्याने पिके कर[ऊन गेली. तर साक्री तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने शेतातून पाण्याचा निचरा होऊ शकला नाही आणि त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. धुळे जिल्यात सर्वाधिक पाऊस झालेल्या ठिकाणी आणि पाणी शिरल्याने कापूस, मका, तूरन ज्वारी आणि बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा – ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ६ लाख झेंड्यांचे वाटप

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -