घरताज्या घडामोडीगद्दारांना प्रश्न विचारायची हिंमत आणि लायकी नसावी, आदित्य ठाकरेंचा घणाघात

गद्दारांना प्रश्न विचारायची हिंमत आणि लायकी नसावी, आदित्य ठाकरेंचा घणाघात

Subscribe

युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मनमाड येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांच्या बंडाळीवर खंत व्यक्त केली आहे. मी आज सकाळी येथे येत असताना अनेक आठवणींना उजाळा देत होतो. नक्की काय घडलं असेल?, याचा मी विचार करत होतो. ही गद्दारी कशामुळे झाली हे कळलंच नाही. दरम्यान गद्दारांना प्रश्न विचारायची हिंमत आणि लायकी नसावी, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघात केला आहे.

गद्दारांना प्रश्न विचारायची हिंमत आणि लायकी नसावी

- Advertisement -

हे राजकारण मला अजूनही कळलेलं नाहीये. मी येथे येण्याआधी भगवान श्रीरामचं दर्शन घेतलं आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई हे एक ब्रीदवाक्य शिवसेनेचं झालंय. तसंच काम आपण करत होतो. येथील पाण्याचा प्रश्न देखील आपण सोडवला. गद्दार नसते तर सर्व प्रश्नांची उत्तर दिलं असती. पण गद्दारांना प्रश्न विचारायची हिंमत आणि लायकी नसावी. शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी जर प्रश्न विचारला असता तर मी उत्तर देण्यासाठी कटीबद्ध आहे. परंतु गद्दारांना मी उत्तर देणार नाही. त्यांनी गद्दारी काय केली हेचं उत्तर त्यांनी मला पहिलं द्यावं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या पाठीत खंजीर का खुपसला?

- Advertisement -

हे राजकारण आपल्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे. ते कुणालाच पटणारं नाहीये. कारण ज्या माणसांनी, कुटुंबप्रमुखांनी आपल्याला एक ओळख निर्माण करून दिली. तसेच आपल्याला जोपासलं आणि सांभाळून घेतलं. तुम्हाला तिकीट दिलं, तुमच्यासाठी प्रचार केला आणि मेहनत घेतली. पण सत्ता आल्यानंतर आपण जे काही राज्यातील जनतेला शब्द दिले होते किंवा जी काही वचनं होती, ती पूर्ण केली असूनही पुढील काम आम्ही करत आहोत. मग अशा मुख्यमंत्र्यांच्या पाठीत यांनी खंजीर का खुपसला?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

टॉप-५ मध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव

मागील अडीच वर्षात आपलं सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात चांगलं चाललं होतं. कारण उद्धव ठाकरेंचं कार्य हे फक्त प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्ह्यात होत नव्हतं. तर संपूर्ण महाराष्ट्रात होत होतं. त्यामुळे संपूर्ण देशभरात उद्धव ठाकरेंचं कौतुक होत आहे. टॉप-५ मध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव होतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मनमाडमध्ये ८ कोटींचा फंड दिला

लोकांची भावना गद्दारांनी ओळखावी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी पर्यटनाच्या विकासासाठी १७०० कोटी रूपये दिले. या मनमाडमध्ये मी अनेक गोष्टींसाठी ८ कोटींचा फंड दिला आहे. कशासाठी दिला याबाबत मी कधीही प्रश्न विचारला नाही, असं ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : शिवसैनिक अनेकदा जेलमध्ये गेले, स्वत:चे जीवन शिवसेनेसाठी समर्पित केले; आमदार केसरकरांचा ठाकरेंना टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -