घरताज्या घडामोडीMaharashtra Budget 2022 : अर्थसंकल्पात रोजगारासाठी मोठी घोषणा, १ लाख नोकऱ्यांची संधी

Maharashtra Budget 2022 : अर्थसंकल्पात रोजगारासाठी मोठी घोषणा, १ लाख नोकऱ्यांची संधी

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प २०२२-२३ विधानसभेत सादर केला. यामध्ये अजित पवारांनी विविध विभागासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पात रोजगारासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 1 लाखाहून अधिक उमेदवारांनी गुंतवणूक प्रस्ताव सादर केले आहेत. विविध बॅंकांनी त्यापैकी 9 हजार 621 प्रस्ताव मंजूर केले असून त्याद्वारे 1 हजार 100 कोटी रूपयांची गुंतवणूक झाली आहे. येत्या वर्षी 30 हजाराहून अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे 1 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण करण्यात आल्या आहेत.

पंड‍िता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना- विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या पंडिता रमाबाई यांच्या स्मृती शताब्दीवर्षानिमित्त पंड‍िता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी या योजनेत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भांडवलाच्या कर्जावरील व्याजाची 100 टक्के परतफेड करण्यात येणार आहे.

- Advertisement -

आयात उत्पादनावरील अवलंबित्व कमी करणे-अनेक वस्तुंची आयात झपाट्याने वाढत आहे. अशा वस्तूंचे उत्पादन राज्यातच व्हावे ह्यासाठी राज्यातील अशा क्षेत्रांतील कार्यरत उद्योगांना उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना किंवा तत्सम योजनेव्दारे लाभ देण्यात येणार आहे.

खादी ग्रामोद्योग केंद्र ,नांदेड-स्वातंत्र्यसैनिक स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांनी 1967 मध्ये नांदेड येथे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची स्थापना केली. माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांनी त्यानंतर या संस्थेचा विस्तार केला. येथेतयार झालेले राष्ट्रध्वज मंत्रालयासह संपूर्ण देशात वापरले जातात. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खादी ग्रामोद्योग केंद्राच्या या इमारतीची पुनर्बांधणी व विक्री केंद्र उभारणीसाठी 25 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

- Advertisement -

आदिवासी औद्योगिक क्लस्टर-आदिवासी समाजातील नवउद्योजकांना प्रोत्साहन व आवश्यक त्यापायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीनाशिक जिल्ह्यांतीलदिंडोरी येथे आदिवासी औद्योगिक क्लस्टर उभारण्यात येणार आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता उद्योग विभागाला885 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

सौर ऊर्जा प्रकल्प

मौजे कौडगाववमौजे शिंदाळा(जि.लातूर), मौजे साक्री(जि.धुळे),वाशीम, मौजे कचराळा(जि.चंद्रपूर) आणि यवतमाळ येथे एकूण ५७७ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील. याशिवायराज्यात २५०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पार्क विकसित करण्यात येणार आहेत.

मुंबई पारेषण प्रणाली सक्षमीकरण प्रकल्प-मुंबई पारेषण प्रणालीच्या क्षमतेत वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे. मुंबईत 11 हजार 530 कोटी रुपयेखर्चाची 400 किलोवॅट क्षमतेची 4 उपकेंद्रे आणि 1 हजार मेगावॅट क्षमतेचा अति उच्चदाब वाहिन्यांचा पारेषण प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना-अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तींच्या घरासाठी प्राधान्याने व स्वस्तात वीज जोडणी उपलब्ध करुन देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबविण्यात येत असून या योजनेचा कालावधी 6 डिसेंबर2022 पर्यंत वाढविण्यात येत आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता ऊर्जा विभागाला9 हजार 926 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.


हेही वाचा : Maharashtra Budget 2022 : ठाकरे सरकारची पंचसूत्री एका क्लिकवर; कृषी, आरोग्य, मनुष्यबळ, दळणवळण, उद्योगांवर लक्ष्य केंद्रित


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -