घरमहाराष्ट्रपुणेअजित पवारांना उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा मोह आवरेना, पुण्यातील कार्यक्रमात नेमकं काय घडलं पाहा!

अजित पवारांना उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा मोह आवरेना, पुण्यातील कार्यक्रमात नेमकं काय घडलं पाहा!

Subscribe

पुणे – विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्ता गेल्यानंतरही उपमुख्यमंत्री पदाचा मोह आवरत नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ते काही वेळापुरते का होईना पण, उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेल्या खुर्चीत विराजमान झालेले पाहायला मिळाले.

पुण्याच्या बालेवाडी स्टेडिअममध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घटानाचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर होते. या व्यासपीठावर राखीव असलेल्या खुर्चीवर संबंधित व्यक्तींचे नाव लिहिण्यात आले होते. त्यानुसार, क्रीड व युवक कल्याण मंत्री गिरिश महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार एका रांगेत खुर्चीवर बसले होते. मात्र, कार्यक्रम उशिराने सुरू झाला. त्यामुळे कार्यक्रमाचे उद्घाटन होताच देवेंद्र फडणवीस दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघून गेले. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री असे लिहिलेल्या राखीव खुर्चीवर बसले. अजित पवारांसाठी राखीव असलेली खुर्ची तेव्हा रिकामीच होती.

- Advertisement -

हेही पाहा – शरद पवार ‘जाणते राजे’ उल्लेखावर फडणवीसांची प्रतिक्रिया

कार्यक्रमावेळी अजित पवार भाषण करायला उठले. त्याच काळात दुसऱ्या कार्यक्रमासाठी गेलेले देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात परतले. व्यासपीठावरील आपल्या राखीव खुर्चीवर ते येऊन बसले. त्यानंतर, अजित पवार त्यांच्यासाठी राखीव असलेल्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यामुळे अडीच वर्षे उपमुख्यमंत्री पद उपभोगल्यानंतर त्यांना अजूनही उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा मोह आवरत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरेंचा जैन समाजाला पाठिंबा, ‘या’ वादग्रस्त प्रकरणासाठी झारखंड सरकारला केली विनंती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -