घरताज्या घडामोडीअजित पवार अद्यापही कोरोनाच्या विळख्यात, बहुमत चाचणीला उपस्थित राहणार का?

अजित पवार अद्यापही कोरोनाच्या विळख्यात, बहुमत चाचणीला उपस्थित राहणार का?

Subscribe

महाविकास आघाडीतील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते अद्यापही पॉझिटिव्ह आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे ते आयसोलेशनमध्ये होते. मात्र, उद्या ३ जुलै आणि ४ जुलै रोजी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. परंतु पवार बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाला सुरूवात झाली. वारंवार आवाहन केल्यानंतरही शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.

- Advertisement -

महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. मात्र, या शपथविधी सोहळ्यानंतर आता येत्या अधिवेशनात नवनिर्वाचित सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

एकनाथ शिंदेंचे बंडखोर आमदार मागील तीन दिवस गोव्यातील मुक्कामाला आहेत. शिंदे समर्थक आमदार गोव्यातून मुंबईकडे रवाना होणार आहेत. परंतु हॉटेलमधून निघण्यापूर्वी शिंदे गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे या आमदारांसोबत गोव्यात असल्याचं सांगितलं जातंय. काल संध्याकाळच्या बैठका घेऊन ते गोव्याला रवाना झाले होते. परंतु आता हे आमदार थोड्याच वेळात मुंबईला रवाना होणार असून गोव्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : डोंबिवलीत ४७ लाखाचा गांजा जप्त, दोन जण अटकेत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -