घरमहाराष्ट्रINDIA : इंडियाच्या सभेला आंबेडकर उपस्थित राहणार, राहुल गांधी यांना राजगृह भेटीचे...

INDIA : इंडियाच्या सभेला आंबेडकर उपस्थित राहणार, राहुल गांधी यांना राजगृह भेटीचे निमंत्रण

Subscribe

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय हक्क यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने रविवारी शिवाजी पार्कच्या मैदानावर होत असलेल्या इंडिया आघाडीच्या सभेला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष Adv. प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमुळे वंचितची महाविकास आघाडीतील सहभागाची शक्यता वाढली आहे.

हेही वाचा – LokSabha 2024 : लोकशाही वाचवण्याची ही अखेरची संधी; निवडणुका जाहीर झाल्यावर काय म्हणाले खर्गे ?

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेचे निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांना दिले होते. हे निमंत्रण आपण स्वीकारत असल्याचे आंबेडकर यांनी ट्वीटरवरून जाहीर केले. याशिवाय त्यांनी राहुल गांधी यांना रविवारी राजगृहावर स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे.

- Advertisement -

मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलेले भारत जोडो न्याय यात्रेच्या महासमारोपाचे निमंत्रण मला मिळाले आहे. मी निमंत्रण स्वीकारले आहे आणि 17 मार्चला शिवाजी पार्क येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. याशिवाय 17 मार्चला खर्गे आणि राहुल गांधी यांना राजगृह येथे भोजनाचे निमंत्रण आम्ही दिले आहे, असे आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : पारदर्शक निवडणुकांची गॅरंटी कोण देणार? संजय राऊतांचा सवाल

जागावाटपाचे काय?

तत्पूर्वी, महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रात केवळ चार जागांची ऑफर देण्यात आल्याने प्रकाश आंबेडकर नाराज असल्याची चर्चा होती. मागील बैठकीत आंबेडकर यांनी राज्यातील 27 लोकसभेच्या जागांची मागणी केली होती आणि या जागांसाठी वंचित बहुजन आघाडी तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. या 27 पैकी काही जागा अशा आहेत की, त्या काँग्रेसच्या समजल्या जातात. वंचित आघाडीच्या यादीत अकोला, दिंडोरी, रामटेक, अमरावती आणि मुंबई शहरातील एक जागा होती, असे सांगितले जाते. मात्र, महाविकास आघाडीकडून त्यांना चार जागांची ऑफर देण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीने आम्हाला दिलेल्या 27 जागांच्या यादीपैकी आम्ही त्यांना चार जागा देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे आणि प्रकाश आंबेडकर यांना या चार जागांबाबत विचार करण्यास सांगितले आहे. त्यांना काय हवे आहे, ते त्यांनी सांगावे. आमचे दरवाजे वंचित बहुजन आघाडीसाठी खुले असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी म्हटले होते.

हेही वाचा – LokSabha Election : ‘समाजाच्या शेवटच्या घटकाकडूनही घडाळ्याचाच गजर’; सुनेत्रा पवारांची फेसबुक पोस्ट व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -