महिला दिनानिमित्ताने अमृता वहिनींच नवं गाणं

अमृता फडणवीस महिला दिनाच्या निमित्ताने एक नवीन गाणं घेऊन येत आहेत. अॅसिड हल्ला पीडित महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हे गाणं आहे.

amruta fadnavis in live concert
या दोन्ही शोजचे काही फोटो अमृता फडणवीस यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केले आहेत.

अमृता फडणवीस या नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी, बिग बी अमिताभ यांच्यासोबत गायलेलं गाणं, तर कधी मुंबई-गोवा बोट उद्घाटनावेळी काढलेला सेल्फी असे अमृता यांच्या चर्चेचे विषय बनत असतात. अमृता फडणवीस महिला दिनाच्या निमित्ताने एक नवं गाणं घेऊन येत आहेत. अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हे गाणं आहे.

संगीत क्षेत्रातून आपली ओळख निर्माण करताना अमृता यांनी विधायक कामेही केली आहेत. आता महिला दिनाचे औचित्य साधून अमृता यांनी अॅसिड पीडितांना प्रोत्साहन देणारे गीत सादर केले आहे. तसेच ”पण मला विश्वास आहे, की या गाण्याने केवळ अॅसिड हल्ल्याने पीडित झालेल्या महिला नाही, तर प्रत्येक महिला या गाण्यामुळे प्रोत्साहित होईल”. असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

अमृता यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरून याबाबत माहिती दिली. अलग मेरा रंग है..असे गाण्याचे बोल असल्याचे ट्विटर पोस्टरवरून दिसून येते. फेस कॅन डिस्ट्रॉय बट नॉट द सोल म्हणजेच केवळ चेहरा नष्ट होऊ शकतो पण मन कधीही नाही, अशी टॅगलाईन या गाण्यासोबत जोडली आहे. या गाण्याबाबत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृता यांनी आम्हाला दया किंवा सहानभूती नको तर आम्हाला लोकांची साथ हवी आहे, असे सांगितले.


हेही वाचा –करीनाच्या चाहत्यांसाठी खुशखबर…