घरताज्या घडामोडीमनसेत बदलाचे वारे; महापालिका कर्मचारी सेना अध्यक्षपदी योगेश शेवरे

मनसेत बदलाचे वारे; महापालिका कर्मचारी सेना अध्यक्षपदी योगेश शेवरे

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत फेरबदलाचे वारे वाहायला लागले असून महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदी सातपूरचे नगरसेवक योगेश किरण शेवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप भवर यांच्या जागेवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचारी सेनेचे राज्य सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ही नियुक्ती केली आहे.

काही दिवसांपूर्वीच मध्य नाशिक विधानसभा निरीक्षक या पदावरुन सचिन भोसले यांना दूर करण्यात आले होते. भोसलेंनी स्थायी समितीच्या निवडणुकीत अ‍ॅड. वैशाली भोसले यांना डावलल्यावरून नाराजी व्यक्त केली होती. पक्षांतर्गत असलेली खदखद त्यांनी शिरीष सावंत यांच्यासमोरच जाहीर केल्याने स्थानिक वरिष्ठ नेत्यांची नाराजी त्यांनी आधीच ओढवून घेतली होती. नाशिक पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड. भोसले यांनी पक्षाला विचारात घेतले नसल्याची तक्रार आधीच पोहोचली होती. त्यानंतर शिवसेनेचे नेते सुनील बागूल यांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवर सचिन भोसलेंचे फोटो झळकले होते. त्यातच काही महिन्यांपूर्वी सचिन भोसले यांनी अंतर्गत गटबाजीची तक्रार थेट राज ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांचे पदच काढून घेण्यात आले. दुसरीकडे महापालिकेतील कर्मचारी सेनेचे अध्यक्ष संदीप भवर यांच्याविषयी देखील तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता प्रभाग क्रमांक ११चे नगरसेवक योगेश शेवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेवरे यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांचे मोठे मोहळ आहे. महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पक्ष संघटन वाढीच्या दृष्टीने शेवरे यांची नियुक्ती झाल्याचे बोलले जाते.

मनसेत बदलाचे वारे; महापालिका कर्मचारी सेना अध्यक्षपदी योगेश शेवरे
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -