घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीकडूनच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला डळमळीत करण्याचा प्रयत्न, आशिष शेलारांचा आरोप

राष्ट्रवादीकडूनच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला डळमळीत करण्याचा प्रयत्न, आशिष शेलारांचा आरोप

Subscribe

माणसाचे आणि पक्षाचे रंग कसे बदलतात आणि नीती नियम सोडल्यावर अनीती आणि अनियमानं सत्ता पिपासू लोक अनैतिक सरकार कसं बनवतात हे 2019ला महाराष्ट्रातील जनतेलं पाहिलं आहे. भाजप या सगळ्याचा साक्षीदार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

मुंबईः अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद जे शिवसेनेकडे गेलंय ते हवं असल्यामुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला डळमळीत करण्याचे वेगवेगळे प्रयोग राष्ट्रवादीकडून केले जातात, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. आशिष शेलारांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

विशेष म्हणजे 2017 सालीच भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती, या विधानावरही आशिष शेलारांनी खुलासा केलाय. हे प्रकरण प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या मुलाखतीत आहे. मी स्वतःहून बोललेलो नाही, तो प्रश्न उत्तराचा एक भाग आहे. जाणाऱ्याला एक वाटत आणि शोधणाऱ्याला शंभर वाटा आहेत. या सगळ्या प्रकरणाचा अर्थ एवढाच आहे की, भाजपला राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्याची ऑफर असतानाही नीतीनियमानं चाललेली भारतीय जनता पार्टी शिवसेनेला सोडून तीन पक्षांच्या सरकारला तयार नव्हती. ज्या शिवसेनेला आता राष्ट्रवादीच्या मांडीवर गुदगुदल्या वाटतायत. त्या शिवसेनेला राष्ट्रवादी मांडीवर सोडा नखाजवळ घ्यायला तयार नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

- Advertisement -

माणसाचे आणि पक्षाचे रंग कसे बदलतात आणि नीती नियम सोडल्यावर अनीती आणि अनियमानं सत्ता पिपासू लोक अनैतिक सरकार कसं बनवतात हे 2019ला महाराष्ट्रातील जनतेलं पाहिलं आहे. भाजप या सगळ्याचा साक्षीदार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

2014 ला शिवसेनेचा दारूण पराभव झाला होता. घोषणा आणि वल्गना कोणाच्याहीविरोधात करताना आम्ही म्हणजे महाराष्ट्र सांगणाऱ्यांना पंचाहत्तरीपण गाठता आली नव्हती. त्यावेळेचे स्टेटमेंट काढा, फुकाचे बोलणारे ज्याला सरकार बनवायचं आहे, त्याला माझ्याकडे यावंच लागेल हे बंगल्यावर बसून बोलत होते आणि हात जोडून सरकारमध्ये आम्हाला घ्या, इथपर्यंत मागे लागत होते. तिथून सगळ्या कहाण्या आहेत, आता पाणी वाहून गेलंय. काही स्वीकारतील, तर काही नाकारतील पण महाराष्ट्र हे विसरला नाही, भाजप हे विसरणार नाही. तुम्ही तिघे एकत्र आलात तरी अशी पटकी टाकू की महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या मुद्द्यावर मोदींसोबत आणि भाजपसोबत घेऊन चालू, असंही आशिष शेलारांनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

मनसे आणि भाजप युतीवरही त्यांनी भाष्य केलंय. मुलाखत घेणाऱ्यानं असं म्हटलं मनसेला भारतीय जनता पार्टी चालवतेय. मनसे तीच भाषा बोलतेय जी भाजपला बोलायची आहे हे सत्य नाही. सांगणं आणि ऐकिवावरच जायचं असेल तर काही लोक दबक्या आवाजात हेही बोलतायत. आमच्याही कानावरती येत आहेत. अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद जे शिवसेनेकडे गेलंय ते हवं असल्यामुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला डळमळीत करण्याचे वेगवेगळे प्रयोग राष्ट्रवादीकडून केले जातात, असंही ते म्हणालेत.


हेही वाचाः …म्हणून मी गाढव पाळतो, गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं ‘कारण’

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -