Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र घरं नाही तर जात पाहिली जाते, लोक मूर्ख....; पंतप्रधान आवास योजनेवरून बच्चू...

घरं नाही तर जात पाहिली जाते, लोक मूर्ख….; पंतप्रधान आवास योजनेवरून बच्चू कडूंचा सरकारवर ‘प्रहार’

Subscribe

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेवरून शिंदे गट समर्थक आमदार बच्चू कडू यांनी शिंदे फडणवीस सरकारवरचं हल्लाबोल केला आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागाला मिळणाऱ्या अर्थसहाय्यातील तफावतीवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. तसेच ज्या ग्रामीण भागावर अन्याय झाल्याचं म्हणत 75 आमदार ग्रामीण भागातून निवडून येतात, त्या आमदारांना याबद्दल काहीचं वाटत नाही असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच सरकारच्या योजना जातीवर आधारीत असल्याचे म्हणत आवास योजनेतही घर नाही तर जात पाहिली जाते, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

बच्च कडूंनी वाचला आवास योजनेतील ग्रामीण भागासाठीच्या अटींचा पाढा

यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, गिरीश महाजन कोणताही चष्मा वापरा आकडेवारी पहिली तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की, केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना आहे, या योजनेअंतर्गत शहरात घरं बांधल तर 2 लाख ५० हजार रुपये दिले जातात, गावात घर बांधलं तर 1 लाख  18 हजार रुपये फक्त मिळतात, तेही शौचालयाचे पैसे पकडून दिले जात आहेत. शहरात घरकुल योजना राबवताना तेव्हा उद्दिष्टांचा विषय नाही, प्रस्ताव जास्त पाठवतो आणि उद्दीष्ट कमी असतं. गावात घर बांधण्यासाठी 21 अटी आहेत, या सर्व अटी पूर्ण कराव्या लागतात. केंद्रात सरकार आपलचं आहे तेथे लगेच सांगाव लागेल म्हणत बच्चू कडू यांनी ग्रामीण भागातील आमदारांवर ताशेरे ओढले आहेत. मतदार मूर्ख आहोत का जे  तुम्हाला मत देतात… आणि आपल्या याबद्दल काही वाटत नाही का? असा संतप्त सवाल राहूल शेवाळे यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी बच्च कडू यांनी अटींचा पाढा वाचून दाखवला.

सरकारच्या योजना जातीवर

- Advertisement -

शहरात जर घरं घ्यायचं असेल तर फक्त 3 लाखांचा उत्पन्नाचा दाखला आणि पीआर कार्ड असेल तर घरं भेटलचं समजा,  काही अटी पूर्ण कराव्या लागत नाहीत. 75 आमदार ग्रामीण भागातून निवडून येतात, खरं तर आमदारांना मतचं दिली नाही पाहिजेत. पण पक्ष, जात आणि धर्मबाबत निष्ठावान असतात ते काय करतात, गिरीश महाजनांचे निष्ठावान, बच्चू कडूंचे निष्ठावान त्यामुळे त्यांना मत द्यावे लागते. शहरांसाठी फक्त उत्पन्नाचा दाखला, सरकारच्या या योजनेमुळे ज्याच्या माथी पक्क घरं होत त्यालाही घरं भेटलं नाही, चांदूर बाजार मतदार संघात ९२४ घरं पडली ही शिकस्थ घरं होती मातीची घरं होती. सरकारच्या योजना जातीवर आहे, घर मातीच असो, पडत असेल, मरत असेल काही अर्थ नाही, जात पाहिली जाते घरं पाहिलं जात नाही, असा आरोपही बच्चू कडू यांनी सरकारवर केला आहे.  या अतिवृष्टीत मातीची घरं पडून ५० लोकं मरण पावली त्यामुळे आता गावात फिरताना शरम वाटते, अशी खंतही बच्चू खडू यांनी व्यक्त केली.


चीनमध्ये कोरोनाचा कहर, महाराष्ट्रात काय तयारी? विरोधकांच्या प्रश्नाला फडणवीसांचे उत्तर

- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -