घरताज्या घडामोडी'बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि मनसैनिक यामध्ये फरक नाही'; बाळा नांदगावकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

‘बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि मनसैनिक यामध्ये फरक नाही’; बाळा नांदगावकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

Subscribe

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि शिवसैनिकांवर टीका केली. त्यानंतर विरोधकांनीही उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर निशाणा साधला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि शिवसैनिकांवर टीका केली. त्यानंतर विरोधकांनीही उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर निशाणा साधला आहे. त्यानुसार, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. “मी बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे. तोच विचार राज ठाकरे महाराष्ट्र सैनिकांना देत आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आणि राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक यांच्यात काहीही फरक दिसत नाही”, असा टोला बाळा नांदगावकर यांनी लगावला. (balasaheb thackeray shiv sainik and raj thackeray manasainik are same says mns leader bala nandgaonkar)

“बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना जन्म दिला असला तरी, आमच्यासारख्या लाखो-करोडो कार्यकर्त्यांना कर्माने बाळासाहेबांनी जन्म दिला आहे. त्यामुळे आमचा अधिकार त्यांच्याहून जास्त असून, कर्माने बाळासाहेबांनी आम्हाला मोठे केले. बाळासाहेब एक विचार, एक संस्कार आणि आम्हाला पुढे घेऊन जाणारे मार्गदर्शक नेतृत्व होते. बाळासाहेब संस्था आहे, त्यावर आमचाही अधिकार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे स्पष्ट आणि परखड बोलतात. त्यांच्या पोटात तेच ओठावर येते. राज ठाकरेंनी मुलाखतीत त्यांची भूमिका ठामपणे मांडली”, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले.

- Advertisement -

“राज यांचा स्पष्ट वक्तेपणा आणि त्यांनी केलेले विधान, पत्र, भूमिका नेहमी चर्चेत राहते. तुम्हाला काय हवं हे राज ठाकरेंना बरोबर माहिती आहे. तसेच प्रत्येकाला आपापला अधिकार आहे. पक्ष पुढे कसा न्यायचा. आम्ही आमची भूमिका पुढे घेऊन चाललो आहोत. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहेत”, असेही नांदगावकर यांनी म्हटले.

“बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर राज ठाकरे वाढलेत. बाळासाहेबांची सगळी भूमिका राज ठाकरेंना माहितीये. हे सरकार बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाईल अशी अपेक्षा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार बाळासाहेबांच्या विचाराने चालेल ही खात्री आहे. मी बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे आणि तोच विचार राज ठाकरे महाराष्ट्र सैनिकांना देत आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आणि राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक यांच्यात काहीही फरक दिसत नाही”, असेही बाळा नांदगावकरांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – तोंड बंद कर, तुला महाराष्ट्र अजून कळला नाही; नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना फटकारलं

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -