घरताज्या घडामोडीहा पक्षांतर्गत वाद, खर्गेंशी चर्चा करणार; बाळासाहेब थोरातांचं सूचक वक्तव्य

हा पक्षांतर्गत वाद, खर्गेंशी चर्चा करणार; बाळासाहेब थोरातांचं सूचक वक्तव्य

Subscribe

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात वरळी येथे बैठक झाली. बैठक पार पडल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसच्या रायपूर येथील बैठकीला उपस्थित राहणार आहे. कारण तिथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं मोठं अधिवेशन आहे. तिथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर प्रमुख मंडळी नेते देखील असणार आहेत. काही प्रश्न प्रत्येक संघटनेचे असतात तसेच याही संघटनेचे आहेत, असं काँग्रेस नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

तुम्ही राजीनामा मागे घेणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, त्यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, याविषयी आमच्या पक्षांतर्गत अजूनही चर्चा सुरू आहेत. त्यामुळे मी त्याला काही महाराष्ट्राचं आणि देशाचं स्वरुप देत नाही. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी एकदा चर्चा करावी, असं एच.के.पाटील यांचं म्हणणं असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले. काँग्रेस संघटना अजून जास्त ताकदवान बनावी आणि त्यामधून महाराष्ट्रातील जनतेची कामं करता यावी, यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत, असंही थोरात म्हणाले.

- Advertisement -

बाळासाहेब थोरात यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर आपलं नाराजीचं पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवलं होतं. पक्षात आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. परस्पर निर्णय घेतले जात असल्याचा आरोप थोरात यांनी केला. थोरात यांनी ज्या दिवशी नाराजीचं पत्र लिहिलं, त्याच दिवशी त्यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी हा राजीनामा थेट काँग्रेस हायकमांडकडे दिला असल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे या प्रकरणी आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -