घर ताज्या घडामोडी क्षीरसागर कधीच शिवसेनेत रमले नाहीत, तिकीट मिळवण्यासाठी केली होती धडपड

क्षीरसागर कधीच शिवसेनेत रमले नाहीत, तिकीट मिळवण्यासाठी केली होती धडपड

Subscribe

माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाशी क्षीरसागर यांचा आता कोणताही संबंध नाही, असं मराठवाडा शिवसेना संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांनी आणि बीड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख उद्धव ठाकरे गट अनिल जगताप यांनी पत्रकार परिषद घेत अधिकृत घोषणा केली.

जयदत्त क्षीरसागर यांनी आपली कसलीच भूमिका स्पष्ट केली नाही. त्यानंतर कोणताही उद्धव ठाकरे गटाचा प्रोटोकॉल त्यांनी पाळला नसून एखाद्या बैठकीला आणि कार्यक्रमाला उपस्थित न राहून आपली भूमिका काय आहे, हे वारंवार विचारून देखील स्पष्ट केली नसल्याने उद्धव ठाकरेंनी त्यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला.

- Advertisement -

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिल्यामुळे नाईलाजाने जयदत्त क्षीरसागरांना शिवसेनेत प्रवेश करावा लागला. २०१९ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढले. बीड विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला सुटल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे शिवसेना हाच एकमेव पर्याय होता. या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केला. या लढतीमध्ये संदीप यांना 99 हजार 934 तर जयदत्त क्षीरसागर यांना 97 हजार 950 मते मिळाली होती.

जयदत्त क्षीरसागर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीकता आहे. त्यामुळे आता क्षीरसागरांच्या रुपाने एक मोठा नेता भाजपकडे आहे. ते भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे क्षीरसागरांची पुढील भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा : शेतकरी संकटात असताना जर कुणी.., उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याबाबत पवारांचं स्पष्टीकरण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -