घरताज्या घडामोडीबारसू रिफायनरी : 'मातोश्री'वरुन कोकण पेटवण्याचा प्रयत्न; नितेश राणेंचा हल्लाबोल

बारसू रिफायनरी : ‘मातोश्री’वरुन कोकण पेटवण्याचा प्रयत्न; नितेश राणेंचा हल्लाबोल

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून बारसू रिफायनरी विरोधात स्थानिकांकडून सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. तीन दिवसांसाठी बारसुतील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. एकीकडे हे आंदोलन स्थगित झाले असले तरी, पोलिसांकडून आंदोलकांवर केलेल्या लाठीचारामुळे राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून बारसू रिफायनरी विरोधात स्थानिकांकडून सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. तीन दिवसांसाठी बारसुतील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. एकीकडे हे आंदोलन स्थगित झाले असले तरी, पोलिसांकडून आंदोलकांवर केलेल्या लाठीचारामुळे राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. राऊतांच्या या टीकेला आता भाजपा नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (BJP Leader Nitesh Rane Slams Uddhav Thackeray Sanjay Raut Aaditya Thackeray On Barsu)

खासदार संजय राऊत यांनी ‘बारसु येथे प्रकल्प करण्यासंदर्भात दिल्लीतून राज्याला आदेश आहेत. काहीही झालं तरी रिफायनरी कराच असे सांगण्यात आले’, असे सांगितले, संजय राऊतांच्या या वक्तव्यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘राज्य अशांत ठेवण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु आहेत. दंगलीचे आदेश मॉरेशसवरुन आल्याचं राऊत म्हणत आहेत, परंतु ते ‘मातोश्री’वर येत आहे’, असे नितेश राणे म्हणाले.

- Advertisement -

“राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेले. त्यानंतर शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीकडून राज्याला अशांत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी
संजय राऊतांना दोन दिवसांअगोदरच ठणकावलं होतं. पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांबद्दल बोलायचं नाही. दंगलीचे आदेश हे मॉरेशसवरुन नव्हे तर मातोश्रीवरुन येत आहेत. ‘मातोश्री’वरुन कोकण पेटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोकणवासियांची माथी गरम करण्याचं काम सुरु आहे. आंदोलनामध्ये बाहेरुन कोण आलंय, याचा तपास पोलिसांनी करावा. संजय राऊतांनी गोळ्या घालण्याची भाषा करु नये”, असेही नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन वाद चागंलाच चिघळला आहे. आंदोलकांनी रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती मिळते. यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहे. डोकं फुटलं तरी चालेल. आम्ही त्यांना काही देणार नाही. अशी भूमिका आंदोलनकर्त्यां महिलांनी घेतली होती.

- Advertisement -

हेही वाचा – बारसूतील आंदोलन तूर्तास स्थगित; मार्ग काढण्यासाठी सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -