आपण काय बोलतो याचा नाना पटोलेंना पत्ताच नसतो, चंद्रकांत पाटलांचा पलटवार

सर्व भाजप जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात येणार आहे की या मुद्द्यावर सर्वांनी आक्रमक व्हा. पुन्हा एकदा राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच वेळ पडल्यास कोर्टात जाऊ असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

chandrakant patil criticize nana patole controvercial statment over modi

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घणाघात केला आहे. नाना पटोले काय बोलतात याचा त्यांना काही पत्ता नसतो. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जसे आहेत तसेच त्यांचे इतर नेते आहेत. नाना पटोलेंच्या वक्तव्याविरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांतील पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांना आक्रमक भूमिका घ्यायला सांगणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, नेता तसा कार्यकर्ता त्यांचे राजकीय नेते सुद्धा असेच गायब होतात काही वक्तव्य करतात, परिणाम काय होईल त्यातून परंपरा काय त्या मोडल्या जातील याची ते काळजी करत नाहीत. तर त्यांचे अध्यक्ष नाना पटोले काय काळजी करणार, मी त्यांना भ्रमीष्ठ म्हणत नाही पण भ्रमीष्ठासारखे त्यांचे आता वर्तण सुरु आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

नाना पटोलेंविरोधात पोलिसांनी तक्रारी घेतल्या नाही

पंजाबच्या घटनेवर ते नौटंकी काय म्हणाले. अमित शाह यांच्यावर आरोप केला की त्यांचाच हा कट आहे. काय बोलतो काय अर्थ होतो त्याचा त्यांना काही पत्ता नाही आहे. भाजप हे सहन करणार नाही. त्यांनी जेव्हा नौटंकी म्हटल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये केसेस दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु कोणत्याही पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात केस दाखल करुन घेतली गेली नाही असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

नाना पटोलेंविरोधात आक्रमक भूमिका घेणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमदार नितेश राणे कुठे आहेत हे मला माहिती असून सांगणार नाही, असे म्हटल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरावर नोटीस लावली. राणे म्हणाले मी असतो तर एक थोबाडीत दिली असती, त्यावर त्यांना अटक करण्यात आली. परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत नाही. काँग्रेस पाठिंबा काढून घेईल. सगळं खुर्चीवरती चालल आहे. सर्व भाजप जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात येणार आहे की या मुद्द्यावर सर्वांनी आक्रमक व्हा. पुन्हा एकदा राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच वेळ पडल्यास कोर्टात जाऊ असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.


हेही वाचा : …म्हणून मी मोदींना मारू शकतो, नाना पटोलेंच्या वादग्रस्त विधानानं खळबळ