घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरअरे हे काय, सरकारमधील मंत्र्याचा मुलगाच काढणार मोर्चा! कुठे घडतेय असं? वाचा-

अरे हे काय, सरकारमधील मंत्र्याचा मुलगाच काढणार मोर्चा! कुठे घडतेय असं? वाचा-

Subscribe

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कोण ते मंत्री, त्यांच्या मुलाचा कोणता असा प्रश्न आहे की, ते सरकारला घरचा अहेर देणार आहेत. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समजून घेऊया.

छत्रपती संभाजीनगर: सध्या राज्यात मराठा, ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलेले असताना यातच सत्तेतील मंत्र्याचा मुलगाच सरकारविरोधात मोर्चा काढण्याची तयारी करत आहे. या मोर्चाची तारीख, वेळ आणि ठिकाण निश्चित झाले असून, यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे सरकारला ‘घरातीलच’ व्यक्तीच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे एवढे मात्र खरे. (What is this the son of the minister in the government will take the march Where is this happening read)

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कोण ते मंत्री, त्यांच्या मुलाचा कोणता असा प्रश्न आहे की, ते सरकारला घरचा अहेर देणार आहेत. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समजून घेऊया.
शिंदे गटातील आमदार मंत्री अब्दुल सत्तार नेहमीच चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते आता त्यांच्या कुठल्याही निर्णयाने किंवा वक्तव्याने नाही तर आता ते चर्चेत आले आहेत, त्यांचा मुलगा अब्दुल समीर यांच्यामुळे. कारण, अब्दुल समीर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे. सत्तेतीलच मंत्र्याचा मुलगा सरकारविरोधात मोर्चा काढत असल्याने तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Cabinet Meeting : राज्य सरकार धनगर समाजासाठी ‘ही’ घोषणा करण्याची शक्यता

हे आहे मोर्चा काढण्यामागील कारण

सत्तेत असूनही एका मंत्र्याच्या मुलाला सरकारविरोधात मोर्चा काढण्याची वेळ कशामुळे आली तर त्याचेही कारण पुढे आले आहे. झाले असे की, राज्य सरकारने मागील आठवड्यात 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. यामधील बहुतांशी तालुके सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील असल्याचीही चर्चा रंगली होती. तर काही शेतकरी संघटनांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता, सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर यांच्या नेतृत्त्वात सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : सीमेवरील घुसखोरी आणि तस्करीला आता मधमाशांचा डंख; बीएसएफचा अनोखा प्रयोग

11 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयावर धडकणार मोर्चा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली 11 नोव्हेंबर रोजी सिल्लोड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सिल्लोड तालुक्याची आणेवारी 50 टक्यांपेक्षा कमी आलेली आहे. यावरून सिल्लोड तालुक्यातील खरीप पिकांची दुष्काळाची दाहकता स्पष्ट होते. असे असताना देखील तालुका दुष्काळ यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -