घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरछ. संभाजीनगर : मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक; आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन

छ. संभाजीनगर : मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक; आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन

Subscribe

छत्रपत्री संभाजीनगर : मराठा आरक्षण व विविध मागण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये (chhatrapati sambhaji nagar) मराठा क्रांती ठोक मोर्चा (Maratha Kranti Thok Morcha) आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणसाठी बलिदान देणारे हुतात्मा काकासाहेब शिंदे (Martyr Kakasaheb Shinde) यांना अभिवादन करून जोरदार घोषणाबाजी करत छत्रपती संभाजीनगर – पुणे मार्गावर कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सरकारने 9 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने देणार आहे, हे जाहीर न केल्यास मुंबई (Mumbai) येथे लाखो मराठा बांधवाचा मोर्चा धडकणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील (Ramesh Kere Patil) यांनी दिला आहे. टास्क फोर्सच्या माध्यमातून सरकार मराठा समाजाची दिशाभूल करून वेळ काढूपणा करत असल्याचा आरोप रमेश केरे पाटील यांनी केला आहे. (Chhatrapati Sambhajinagar Maratha Kranti Thok Morcha Aggressive Rasta Roko Andolan for reservation)

मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदेंसह पन्नास मराठा बांधवांचे बलिदान

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाच वर्षांपूर्वी 23 जुलै 2018 रोजी जुने कायगाव येथील गोदावरी नदीपात्रात हुतात्मा काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली होती. काकासाहेब शिंदेंसह पन्नास मराठा बांधवांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन बलिदान दिले आहे. मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या प्रलंबित कोणत्याही मागण्या सरकार आजपर्यंत मराठा समाजाला देऊ शकले नसल्याने मराठा क्रांती मूक मोर्चा पुन्हा आक्रमक झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnvis : मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा केलं स्पष्ट

गावपातळीवर संवाद मोर्चाचे आयोजन करणार

मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा समाजात जनजागृती व्हावी, यासाठी गावागावात मराठा आरक्षण संवाद मोर्चे काढणार असल्याचं, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षण न मिळाल्याची सल मनात; आई मीराबाई शिंदे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जुने कायगाव येथील गोदावरी नदीपात्रात 23 जुलै 2018 रोजी काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली होती. त्यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे कुटुंबीय काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. ज्या आरक्षणासाठी मुलगा काकासाहेब शिंदे व 50 मराठा बांधवांनी बलिदान देऊनही आरक्षण न मिळाल्याची सल मनात असल्याची खंत काकासाहेब शिंदे यांच्या आई मीराबाई शिंदे, वडील दत्तात्रय शिंदे, भाऊ अविनाश शिंदे यांनी व्यक्त केली. मुलाच्या आठवणीत आई मीराबाई शिंदे यांना अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा – BMC : मुंबई पालिकेच्या कंत्राटात ‘अनियमितता’, SITकडून तीन प्राथमिक चौकशींची नोंद

पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने छत्रपती संभाजी नगर – पुणे महामार्गावर कायगाव गोदावरी नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

महामार्गावरील वाहतूक काही काळ संथ गतीने

छत्रपती संभाजीनगर – पुणे महामार्गावर कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती. आंदोलन संपताच पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -